राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांची खिल्ली उडवणारी नक्कल तृणमूल कॉंग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी मंगळवार, १९ रोजी संसदेच्या आवारात केली. विशेष म्हणजे ते हि नक्कल करत असताना कॉंग्रेस नेता राहुल गांधी यांनी त्यांचा व्हिडीओ बनवला. हा प्रकार अत्यंत लाजीरवाणा आणि लज्जास्पद असल्याचे मत या सर्व प्रकारावर सभापती जगदीप धनखड यांनी व्यक्त केले.
हेही वाचा..
लोकसभा अध्यक्षांकडून ४९ खासदारांचे निलंबन
नोटांवर एका माणसाचाच फोटो का? सावरकर,टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे फोटो कधी येणार?
लालकृष्ण अडवाणी, एमएम जोशींना राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला न येण्याची केली विनंती!
भारत हा जगातील ‘स्टार परफॉर्मर’ – आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
या सर्व प्रकारावर बोलताना सभापती जगदीप धनखड म्हणाले, कल्पना करा कि कॉंग्रेस पक्षाचा एक वरिष्ठ नेता दुसऱ्या पक्षाच्या खासदाराचा व्हिडीओ काढत आहे. तो खासदार सभापतींची नक्कल करतो हा प्रकार किती हास्यास्पद आहे. सोमवारपासून राज्यसभा आणि लोकसभेतील किमान १४० खासदारांच्या निलंबनाच्या विरोधात विरोधी पक्षांचे खासदार निदर्शने करत असताना हे नक्कल करण्याचे कृत्य करण्यात आले. यावेळी उपस्थित खासदार हे हसून त्यांच्या नक्कलेला प्रतिसाद देत होते आणि राहुल गांधी त्यांचा व्हिडीओ काढत होते. संसद सुरक्षा भंगाच्या घटनेविरोधात खासदारांनी दोन्ही सभागृहात व्यत्यय आणला. या सर्व प्रकारची चौकशी दिल्ली पोलीस करत असताना खासदारांकडून व्यत्यय आणण्याचा प्रकार घडला, त्यामुळे निलंबन करण्यात आले.
दरम्यान राज्यसभा सभापतींचा अपमान होत असताना हसतमुखाने राहुल गांधी यांनी अशा असंसदीय वर्तनात सहभाग घेतला. अर्थात राहुल गांधी यांची हि पहिली वेळ नाही. यापूर्वी सुद्धा गांधी यांनी अशी कृत्ये केलेली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावाची खिल्ली उडवल्याबद्दल राहुल गांधी यांना मार्चमध्ये लोकसभेतून अपात्र ठरवण्यात आले होते. याशिवाय ७ डिसेंबर रोजी एक्सवर एक क्लिप शेअर केली आहे, त्यात राज्यसभा खासदार जगदीप धनखड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हात जोडून अभिवादन केले आहे, मात्र या फोटोच्या माध्यमातून त्यांना उपराष्ट्रपती हे पंतप्रधान यांच्या समोर नतमस्तक होतात हे दाखवायचे होते. यावर सभापती धनखड म्हणाले, मी स्वभावाने नम्र आहे, तरी मी अधिक नम्र होण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु अशा पदाची चेष्टा करणे योग्य नसल्याचे ते म्हणाले.