राज्यात सूर्याचा पारा चढलेला आहे. साधारणपणे होळीनंतर उष्णतेत आणखी वाढ होते. आता होळीतच पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्याच्या काही भागात पुढील चार दिवसात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
फेब्रुवारी महिन्यात अचानक उष्णतेची लाट आली. मार्चच्या तडाख्याच्या आधीच फेब्रुवारी मध्ये राज्याच्या अनेक भागात उन्हाचा पारा ३५ ते ४० अंशावर गेला होता. दिवसभर गरम आणि रात्री थंड असे वातावरण होत त्यातच आता हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अनेक भागात ढगाळ वातावरण आहे.
हवामान खात्याने होळीच्या आधी म्हणजे ४ ते६ मार्चच्या दरम्यान राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे.
फेब्रुवारी महिन्यातील कडक उन्हाचा अंदाज घेत हवामान खात्याने मार्च आणि मे महिन्यात कडाक्याचे ऊन पडेल, असा अंदाज व्यक्त केला होता. उष्णतेची लाट येण्याचा अंदाज वर्तवला असतांना आता मध्येच पाऊस हजेरी लावेल अशी शक्यता आहे.
शनिवारी मुंबईत किमान तापमान २२.६ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान ३५.५ अंश सेल्सिअस नोंदले गेले. हे हवामान सामान्य पातळीपेक्षा तीन अंशांनी जास्त आहे.
हे ही वाचा :
ब्रिस्बेनच्या लक्ष्मी नारायण मंदिरात मोदींविरोधी घोषणा
स्टम्प घेऊन आलेल्या हल्लेखोरांचे कोच कोण हे पण आम्हाला माहिती
संदीप देशपांडे हल्ला प्रकरणात मोठी अपडेट, संशयाची सुई ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यावर
हिमंता बिस्वसर्मांनी राहुल गांधींवर केला ट्विट हल्ला!
जकार्तामध्ये तेल गोदामाला लागलेल्या आगीत १७ जणांचा होरपळून मृत्यू
हवामान खात्याच्या अंदाजनुसार रायगड, विदर्भ, कोल्हापूर आणि अहमदनगरच्या वेगळ्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. राजस्थान आणि उत्तर महाराष्ट्रावर पश्चिम विक्षोभ आणि चक्रीवादळ तयार झाल्यामुळे, राज्याच्या अनेक भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. यामुळे तपमानात आणखी वाढ होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने मुंबई शहरात ६ ते ७ मार्च दरम्यान कधीही संध्याकाळी हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.