मोचा चक्रीवादळाचा धोका, महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता

तीन राज्यांना दिला अलर्ट

मोचा चक्रीवादळाचा धोका,  महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता

रविवारपासून बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. मोचा असे नाव दिलेले हे वादळ एक ते दोन दिवसात अधिक धोकादायक बनण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. चेन्नई आणि लगतच्या भागांमध्ये त्याचे वादळात रुपांतर होऊ शकते. पंजाब, हरयाणा आणि राजस्थान या तीन राज्यांत गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय केरळ, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्येही मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

भारताच्या पूर्व किनारपट्टीला मोचा चक्रीवादळाचा धोका आहे. या आठवड्यात पश्चिम बंगाल आणि ओडिशात हे वादळ धडकेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बंगालच्या खाडीत चक्रवाताची स्थिती तयार होत आहे. त्यामुळे ८ मे पर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. मोचा चक्रीवादळ पूर्व किनारपट्टीला धडकणार असले तरी याचा परिणाम देशातील इतर राज्यातही होणार आहे.

मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, बिहार, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशमध्ये पुढील४ दिवस हवामान खराब राहू शकते. ९ मे पर्यंत खाडीच्या दक्षिण-पूर्व दिशेला कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची आणि चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ मंगळवार किंवा बुधवारी उत्तरेच्या दिशेने मध्य बंगालच्या खाडीकडे जाईल असा अंदाज हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी व्यक्त केला आहे.

हे ही वाचा:

आयपीएलमध्ये विराट ठरला सात हजारी मनसबदार

विसरभोळेपणामध्ये दिल्ली पहिल्या क्रमांकावर, कमोड, झाडूही विसरतात टॅक्सीत

तामिळनाडूतही बुलंद झाला शिवछत्रपती, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा नारा

एकलव्य खाडे, आर्यन सकपाळ यांनी ठोकली शतके

पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये या चाकरी वादळाचा जास्त प्रभाव दिसून येण्याची शक्यता आहे. रविवारी ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.त्यामुळे मच्छिमारांना पुढील ४ दिवस समुद्रापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. जे लोक बंगालच्या खाडीत दक्षिण-पूर्व दिशेला आहेत त्यांनी ७ मे च्या आधी आणि मध्य खाडीत असलेल्यांनी ९ मेच्या आधी सुरक्षित ठिकाणी परतण्याचा सल्लाही हवामान विभागाने दिला आहे.

Exit mobile version