एका महिला दिवाणी न्यायाधीशाने सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे इच्छामरणाची मागणी केली आहे.महिला दिवाणी न्यायाधीश उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात कार्यरत आहेत.त्यांनी सर्वोच्च नायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना पत्र लिहून मृत्यूची परवानगी मागितली आहे.तिने पत्रात लिहिले आहे की, २०२२ मध्ये बाराबंकी जिल्ह्यात तिची नियुक्ती झाली तेव्हा तेथील जिल्हा न्यायाधीशांनी तिचे शारीरिक आणि मानसिक शोषण केले.
इतकेच नाहीतर जिल्हा न्यायाधीशांनी तिच्यावर रात्री भेटण्याचा दबावही टाकला होता.याबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयात अपील केले होते.पण, नायाधीश होऊनही त्यांना न्याय मिळाला नाही.त्यामुळे ती इच्छामरणाची मागणी करणारे हे पत्र लिहीत आहे.न्यायमूर्ती असूनही मला न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्यांचे काय होईल, असेही पीडित महिला न्यायाधीशांनी पत्रात लिहिले आहे.
पीडित महिला न्यायाधीशाने सांगितले की, माझ्यासोबत जे काही घडले त्याबद्दल मी एक खुले पत्र जारी केले आहे.या पत्रात मी सर्व काही गोष्टी लिहिल्या आहेत.या संपूर्ण प्रकरणाबाबत मी याचिकाही दाखल केली होती.पण, ती फेटाळण्यात आली.त्या पुढे म्हणाल्या की, जेव्हा मी या प्रकरणाची तक्रार केली तेव्हा तक्रार स्वीकारण्यासाठी जवळपास सहा महिने लागले.तर, या प्रक्रियेला केवळ तीन महिने लागतात.
हे ही वाचा:
धोनीच्या ७ क्रमांकाच्या जर्सीने ‘पाठ’ सोडली!
ब्रिटिश खासदारांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमने
दहशतवाद्यांचा गड मानल्या जाणाऱ्या पुलवामामध्ये शिवलिंगाची प्रतिष्ठापना!
तीने पुढे पत्रात लिहिले आहे की, मी या संकटांपासून व्यथित असताना माझी कोणीही विचारपूस केली नाही. उच्च न्यायालयाच्या अंतर्गत तक्रार समितीकडेही तक्रार केली.परंतु समितीकडून सांगण्यात आले की, चौकशी सुरु आहे.हा सर्व दिखाऊपणा आहे.
दरम्यान, महिला न्यायाधीशाने लैंगिक छळाचा आरोप केल्यानंतर भारताचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून अहवाल मागवला आहे.इंडिया टुडेच्या बातमीनुसार, सरन्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरचिटणीस अतुल एम कुर्हेकर यांना स्टेटस अपडेट घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर कुर्हेकर यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरल यांना पत्र लिहून महिला न्यायाधीशांनी केलेल्या सर्व तक्रारींची माहिती मागितली आहे.तसेच उच्च न्यायालयाच्या अंतर्गत तक्रार समितीकडे देखील सद्यस्थितीचा अहवाल मागवण्यात आला आहे.