29 C
Mumbai
Monday, January 13, 2025
घरविशेषमी ‘काडतूस’ आहे…झुकेगा नही!

मी ‘काडतूस’ आहे…झुकेगा नही!

देवेंद्र फडणवीसांठी आमदार चित्रा वाघ यांची खास पोस्ट

Google News Follow

Related

राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार असून मुख्यमंत्री भाजपाचा होणार आहे. मुख्यमंत्री म्हणून भाजपा नेते देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत मुंबईतील आझाद मैदान येथे आज (५ डिसेंबर ) शपथसोहळा पार पडणार आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनणार असल्याने भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ‘मी पुन्हा येईन’, असे फडणवीस पूर्वीच म्हणाले होते आणि आता त्यांचे हे शब्द सत्यात उतरत आहे. यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी भाजपा महिला नेत्या आमदार चित्रा वाघ यांनी खास पोस्ट करत विरोधकांवर टीका केली आहे. मी ‘काडतूस’ आहे…झुकेगा नही, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

चित्रा वाघ यांनी ट्वीटकरत म्हटले, ‘मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे घर मत बसा लेना, मै समंदर हूं, वापस आऊंगा’, असं तो म्हणाला, तेव्हा त्याची खिल्ली उडवली गेली… पण आज हा समुद्रासारख्या विशाल अंतःकरणाचा, समुद्राएवढ्या कर्तृत्वाचा, समुद्राइतकी वैचारिक खोली असणारा देवाभाऊ परत आलाय.

‘आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत, आम्ही चक्रव्यूह भेदणं जाणतो’, असं हा आधुनिक अभिमन्यू म्हणाला, तेव्हा त्याची चेष्टा झाली, पण त्यानं कावेबाजांचा, कुटिल कारस्थानांचा चक्रव्यूह भेदला. असा काही भेदला, की त्यातून उडालेल्या तेजाच्या किरणांनी भल्याभल्यांचे डोळे दीपून गेले. कुरुक्षेत्रावरचं युद्ध खूप जटिल, अवघड असणार आहे, हे या अभिमन्यूला माहीत आहे. पण त्याला कर्तृत्वाची कवचकुंडलं मिळाली आहेत. ती घेऊन सर्वशक्तिनिशी तो परत आलाय.

त्या पुढे म्हणाल्या, ‘मी पुन्हा येईन’ असं देवाभाऊ म्हणाला, तेव्हा त्याच्याविरुद्ध पाच वर्षं सातत्यानं कटकारस्थानांचे डोंगर रचले गेले; पण तो परत आलाय. परत आलाय गावांना जलयुक्त करण्यासाठी, शहरांचा चेहरा बदलण्यासाठी, महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी, नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी.

हे ही वाचा : 

उत्तरप्रदेश सरकार मदरसा कायद्यात सुधारणा करण्याच्या तयारीत

बाबा सिद्दीकींच्या हत्येपूर्वी सलमान खानच्या हत्येची योजना होती, परंतु…

पुतीन यांना ‘मेक इन इंडिया’ची भुरळ!

शपथविधीसाठी खास ‘संत तुकाराम महाराज केशर पगडी’ तयार

‘देवाभाऊ जो बोलता है, वो करता है, और जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता है’ असं म्हणणारा देवाभाऊ पाच वर्षांआधी जे बोलला, ते त्यानं करून दाखवलंय दोस्तों आणि जे नाही बोलला, ते ‘डेफिनेटली’ करण्यासाठी आता परत आलाय. ‘फडतूस नाही, काडतूस आहे. झुकेगा नही घुसेगा साला’ असं तो म्हणाला होता. येस्स. या देवाभाऊनं ‘फडतूस’ लोकांना ‘काडतूस’ बनून पाताळात गाडलं. आता ‘झुकण्या’साठी नाही, तर ‘घुसण्या’साठी तो परत आलाय.

देवाभाऊचा पाच वर्षांचा मुख्यमंत्रिपदाचा काळ हा महाराष्ट्राच्या विकासाच्या इतिहासातला सगळ्यात सोनेरी कालखंड होता. त्यानंतर अडीच वर्षं तो विरोधी पक्षनेता बनून कुटिल लोकांवर तुटून पडला. पुढची अडीच वर्षं धोरणीपणानं डावपेच आखत राहिला. आता तो परत आलाय. त्याचा पिक्चर संपलेला नाही. उलट त्याचा पिक्चर आता ॲक्शननं भरपूर असणार आहे. त्याच्या पिक्चरचं नाव कुणी तरी ‘अकेला फडणवीस’ असं ठेवलं होतं.

पण त्याला चौदा कोटी जनतेनं पुन्हा एकदा ‘हिरो’ बनवलं. येस्स. तमाम महाराष्ट्राचा लाडका, जिगरबाज, चाणक्यनीतीत तरबेज, बहिणांचा पाठिराखा, शेतकऱ्यांचा सच्चा साथी, वंचितांचा खंदा आधार असलेला देवाभाऊ पाच वर्षांसाठी अवतरला आहे. आता तो काय करतो ते बघाच. देवाभाऊका असली पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
221,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा