धुळ्यात अनधिकृत टिपू सुलतान स्मारक रात्री उशिरा हटविले

धुळे शहरातील ऐंशी फुटी रोड व वडजाई रोड चौकात काही दिवसांपुर्वी एक स्मारक उभारले गेले होते

धुळ्यात अनधिकृत टिपू सुलतान स्मारक रात्री उशिरा हटविले

शहरातील ऐंशी फुटी रोड व वडजाई रोडलगत उभारण्यात आलेले आणि वादग्रस्त ठरलेले टिपू सुलतान स्मारक रात्री उशिरा हटवण्यात आले. अनधिकृतपणे कुठलीही परवानगी न घेता हे स्मारक उभारले गेल्याचे जिल्हाप्रशासनाच्या चौकशीत स्पष्ट झाल्याने जिल्हाप्रशासनो कार्यवाही केली. तसेच जिल्हाधिकार्यांच्या आदेशाने ज्यांनी हे अनधिकृतपणे स्मारक बांधले होते त्यांनीच ते रातोरात जमीनदोस्त केले, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.

 

धुळे शहरातील ऐंशी फुटी रोड व वडजाई रोड चौकात काही दिवसांपुर्वी एक स्मारक उभारले गेले होते, त्याला टिपू सुलतान असे नाव देण्यात आले होते. मात्र यावर भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांसह पदाधिकार्यांनी आक्षेप धेतला होता. भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष ऍड.रोहित चांदोडे यांच्यासह पदाधिकार्यांनी पोलिस अधिक्षकांना आणि जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन टिपू सुलनात स्मारकावर तसेच ते उभारण्यांवर कारवाईची मागणी प्रशासनाची युध्दपातळीवर कारवाई केली होती.

हे ही वाचा:

सादरीकरणावेळी मंचावरचं भरतनाट्यम गुरु श्री गणेशन यांचे निधन

पालखी मार्ग, वारकऱ्यांची विश्रांती स्थाने, पाण्याची व्यवस्था उत्तम राखा!

भाई जगतापांची गच्छंती, वर्षा गायकवाड मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष

चीनी कंपनी शाओमी टेक्नोलॉजीला ईडीचा दणका

त्यानंतर काल भाजपाचे नगरसेवक तथा माजी स्थायी समिती सभापती सुनिल बैसाणे यांनी थेट महापालिकेच्या प्रवेशव्दारावर धरणे आंदोलन करीत टिपू स्मारक हटवा, धुळे शहराची शांतता वाचवा, अशी मागणी केली होती. या आंदोलनात सहभागी होत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांनी देखील टिपू स्मारक हटवण्याचे आवाहन केले होते.

 

महापौर प्रतिभा चौधरी यांनी देखील आंदोलनाची तत्काळ दखल घेतली आणि अनाधिकृत, बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेले टिपूचे स्मारक तात्काळ निष्कासित करण्याचे आदेश महापौर प्रतिभा चौधरी यांनी महापालिका प्रशासनास दिले होते.

Exit mobile version