महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) मालकीची गोराई येथे समुद्रकिनाऱ्यापासून काही अंतरावर जागा आहे. याच जागेवर अनधिकृतपणे घरे बांधून, ती घरे विक्री केल्याचा प्रकार सोमवारी उघड झाला. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर गोराई पोलिसांनी पती- पत्नी विरोधात फसवणुकीसह इतर अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
गोराईच्या सर्व्हे क्रमांक ५३ येथे एमटीडीसीची समुद्र किनाऱ्यापासून काही मिनिटे अंतरावर जागा आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी या जागेवर घरांचे बांधकाम करत त्याची विक्री केली जात असल्याची तक्रार महामंडळाला मिळाली. माहितीमध्ये तथ्य असल्याची खात्री होताच संबंधित प्रकरणाची तक्रार १९ मे २०२१ रोजी गोराई पोलीस ठाण्यात करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी चौकशी करत ७ सप्टेंबर रोजी दिनेश पवळे आणि त्याच्या पत्नीवर गुन्हा नोंद केला. पण या प्रकरणात अद्यापही कोणाला अटक झालेली नाही.
ही वाचा:
रशियात घुसखोरीसाठी जिहादी सज्ज
संजय राऊतांचे अग्रलेख म्हणजे तालिबानी प्रवृत्तीचे उदाहरण
अभिमानास्पद! भारतात लसीकरणाचा ‘अमृत महोत्सव’
हसन मुश्रीफ आणि कुटुंबियांनी असे केले शेकडो कोटींचे घोटाळे
गोराईतील जागा ही समुद्र किनाऱ्यापासून अवघ्या १५ मिनिटांच्या अंतरावर असून, त्या जागेवर घरांचे बांधकाम करत विक्री करून अनेकांची फसवणूक केली गेल्याची माहिती मिळाली आहे. संबंधित प्रकरणाची तक्रार दाखल केली असून अन्य कोणाची यात फसवणूक होऊ नये, अशी इच्छा आहे, असे वरिष्ठ व्यवस्थापक परिमंडळ, महाराष्ट्र पर्यटन विभाग महामंडळाचे सुभाष देखणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.