28 C
Mumbai
Saturday, December 13, 2025
घरविशेषअहमदाबादेत बांगलादेशींना उखडून टाकण्यासाठी ८० जेसीबी, ६० डंपर

अहमदाबादेत बांगलादेशींना उखडून टाकण्यासाठी ८० जेसीबी, ६० डंपर

ताब्यात घेतलेल्या ८९० व्यक्तींमधील १४३ जण हे बांगलादेशी

Google News Follow

Related

अहमदाबादमधील चांदोला तलाव परिसर, जो ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील पश्चिम बंगालमार्गे भारतात आलेल्या बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांचे केंद्र बनला आहे, येथे आज, २९ एप्रिल रोजी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येत आहे. ही कारवाई अहमदाबाद महानगरपालिका (AMC) आणि राज्य पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांनी सुरू करण्यात आली आहे. यासाठी तब्बल ८० जेसीबी मशीन आणि ६० डंपर तैनात करण्यात आले आहेत. अहमदाबादच्या सातही विभागांतील इस्टेट अधिकारी या मोहीमेस उपस्थित आहेत. कारवाईच्या एक दिवस आधीच बेकायदेशीर वीज कनेक्शन्स कापण्यात आले होते.

शहर पोलीस आयुक्तांनी या कारवाईच्या पूर्वसंध्येला चांदोला तलाव परिसराची पाहणी केली होती. शहर पोलिसांनी रात्रीची मोहीम राबवून सुमारे १,००० संशयित बांगलादेशी नागरिकांना ओळख पटवणीसाठी ताब्यात घेतले. यानंतर अनेक घुसखोरांनी स्वतःहून आपली घरे रिकामी केली.

हे ही वाचा:

पाकिस्तानची भीतीने उडालीये भंबेरी; सियालकोट तळावर रडार यंत्रणा केली तैनात

अमृता खानविलकरने काय आठवणी सांगितल्या जपान ट्रिपच्या ?

खलिस्तान समर्थक जगमीत सिंग पराभूत; कॅनडात NDP पक्षाला फक्त २ टक्के मतं

जम्मू-काश्मीर : बारामुल्लामधील भीषण आगीत दोन घरे खाक

बेकायदेशीर नागरिकत्व, अतिक्रमण आणि कारवाई

चांदोला तलाव परिसरात बांगलादेशी घुसखोरांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले असून, पश्चिम बंगाल सरकारच्या कथित सौम्य धोरणांमुळे या घुसखोरांना खोटे भारतीय नागरिकत्व मिळवण्यात मदत झाली आहे. ताब्यात घेतलेल्या ८९० व्यक्तींमधील १४३ जण हे बांगलादेशी नागरिक असल्याचे स्पष्ट झाले आहे, तर २०० जणांची ओळख पटवल्यानंतर त्यांना मुक्त करण्यात आले.

लल्लू बिहारीचा फार्महाऊस जमीनदोस्त

या कारवाईत लल्लू बिहारी उर्फ मेहमूद याचे फार्महाऊस विशेष लक्ष वेधून घेत आहे. तो सध्या फरार असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लल्लू आणि त्याचा मुलगा बनावट भाडेकरार तयार करून देत होते, तसेच ते वेश्या व्यवसायही चालवत होते. त्याच्या फार्महाऊसमध्ये एसी रूम्स, बाग, किचन आणि मुलांसाठी खेळाचे मैदान होते. त्याच्याकडे ५० गाड्या आणि २५० रिक्षा होत्या.

लल्लू बिहारीने उच्च व्याजदराने सावकारी व्यवसायही सुरू केला होता. पैसे न दिल्यास रिक्षा हिसकावून घेतली जात असे. तो रिक्षा व दुचाकीसाठी पार्किंग कार्ड्स देऊन त्यासाठी शुल्क घेत असे. ‘काश सावरनी कॉर्नर’ आणि ‘ए-वन झाडू’ मार्फत पैसे गोळा केले जात. जुहापुरा येथे ‘ए-वन नगर’ नावाची निवासी योजना त्याने सुरू केली होती.

देशी दारूचा गोदाम सापडला

ज्या वेळी बुलडोझर बांगलादेशी झोपडपट्टीत शिरले, त्यावेळी पोलिस आणि पत्रकारांना एका घरात मोठ्या प्रमाणावर देशी दारूचे प्लास्टिक पिशव्यांमधील गोदाम सापडले.

पोलीस आयुक्तांनी सांगितले की, “लल्लू बिहारीने तलाव परिसरात दुकाने, २०० हून अधिक रिक्षा, घोडे तयार केले होते. बनावट भाडेकरार करण्यात तो मदत करत होता. सुप्रीम कोर्टाने तलाव अतिक्रमणविरोधात आदेश दिला आहे. २००९ मध्येही कारवाई झाली होती, पण नंतर त्यांनी पुन्हा अतिक्रमण केले. शहरातील इतर भागांतील बांगलादेशी घुसखोरांचाही शोध घेतला जात आहे. सध्या १९० घुसखोर ओळखले गेले आहेत. लल्लू बिहारीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून क्राईम ब्रांच त्याची व त्याच्या सहकाऱ्यांची चौकशी करेल.”

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा