30 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरविशेषसहआयुक्त संखेंच्या बदलीमुळे अनधिकृत बांधकामांना अभय ?

सहआयुक्त संखेंच्या बदलीमुळे अनधिकृत बांधकामांना अभय ?

Google News Follow

Related

वसई विरारमधील अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई करणारे सहआयुक्त मोहन संखे यांची उचलबांगडी करून अनधिकृत बांधकामांना आपले अभय आहे, असाच जणू संदेश वसई विरार महानगरपालिकेने दिला आहे. या महानगरपालिकेच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामांविरोधात संखे यांनी कारवाई तीव्र केली होती.

पेल्हार येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी संखे यांनी पाऊल उचलल्यावर २५ जूनलाच त्यांची प्रभाग समिती चंदनसार येथे बदल झाल्याचे पत्र त्यांना देण्यात आले. २६ जूनला त्यांनी तो पदभार स्वीकारला. पण या निमित्ताने अनधिकृत बांधकामांना पालिकेतूनच अभय मिळते आहे की काय, असा सवाल विचारला जात आहे.

गेल्याच आठवड्यात स्टिंग ऑपरेशनमधून संखे यांनी अतिरिक्त आयुक्त आशीष पाटील यांच्याविरोधात केलेले वक्तव्य गाजले होते. अतिरिक्त आयुक्त आशीष पाटील, ठेका अभियंता स्वरूप खानोलकर आणि भूमाफिया यांचे साटेलोटे असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. यासंदर्भात काँग्रेसचे ह्युमन राइट्स पालघर जिल्हाध्यक्ष अल्ताफ सय्यद यांनी हे स्टिंग ऑपरेशन करून कशापद्धतीने अनधिकृत बांधकामांना पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचाच आशीर्वाद आहे, हे सांगितले. त्यात मोहन संखे यांनी पालिकेतील वरिष्ठ अधिकारीच कसे यात गुंतलेले आहेत, हे वास्तव मांडले होते. आपल्याला यासंदर्भात कारवाई करू दिली जात नाही. दबाव आणला जातो, अशीही त्यांची तक्रार होती. हा व्हीडिओ आणि अनधिकृत बांधकामांच्या बातम्यांची चर्चा सुरू झाल्यानंतरच संखे यांची बदली झाली.

हे ही वाचा:

अविनाश भोसलेंना ईडीचे समन्स

अशा भ्याड हल्ल्याने बहुजन समाज घाबरणार नाही

कोस्टल रोडच्या कामात खोडा घालणाऱ्यांना खडे बोल

पडळकरांवर झालेल्या हल्ल्यांनंतर भाजपा नेते आक्रमक

उमर कंपाऊंड, विरार पूर्वेत आनंदी नगर, गुपचर पाडा, फुलपाडा, साकारनगर येथे असंख्य अनधिकृत कामे सुरू आहेत. झाडे तोडून ही कामे सर्रास होत आहेत. या अनधिकृत बांधकामे करणाऱ्या बिल्डरांवर गुन्हा दाखल व्हायला हवा. नगरपालिकेला आदेशही असतात हे बांधकाम तोडण्याचे पण कारवाई होत नाही. उलट या अनधिकृत बांधकामांवर कर्जही उपलब्ध करून दिले जात आहे, असे मत अल्ताफ सय्यद यांनी व्हीडिओद्वारे मांडले होते.

यासंदर्भात आशीष पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न ‘न्यूज डंका’च्या वतीने करण्यात आला, पण तो संपर्क झाला नाही. त्यांना मेसेज पाठवून यासंदर्भात त्यांचे मत विचारण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता.

‘न्यूज डंका’ने त्यांच्याशी संपर्क साधल्यावर ते म्हणाले की, माझी बदली याच कारणामुळे झाली असे मला वाटत नाही. तो एक पालिकेतील नेहमीच्या प्रक्रियेचा भाग असतो. पण मी काही प्रमाणात अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली होती. त्याचदरम्यान बदली झाली आहे. आता नवे अधिकारी ते काम पूर्ण करतील.

दरम्यान, पालिका आयुक्त गंगाधरन यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. आता या महानगरपालिकेच्या हद्दीतील असंख्य अनधिकृत बांधकामांविरोधात विविध राजकीय पक्षांनी आवाज उठवावा. बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर, श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित अशा नेत्यांनी यात लक्ष घालावे, अशी आग्रही मागणी होऊ लागलेली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा