IIDL तर्फे मॉडेल इंटरनॅशनल लीडर्स मीटचे यशस्वी आयोजन
युनियन बँक प्रस्तुत मॉडेल इंटरनॅशनल लीडर्स मीट २०२२ चे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रॅटिक लीडरशिप द्वारे आयोजन करण्यात आले होते. ह्या कार्यक्रमाचे उद्घाटन गेटवे हाऊसच्या कार्यकारी संचालक मनजीत कृपलानी यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे मुख्य शैक्षणिक अधिकारी आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रॅटिक लीडरशिप (IIDL) चे अभ्यासक्रम संचालक देवेंद्र पै होते. दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानव सिंग होते. IIDL ही एक अनोखी संस्था आहे जी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने लोकशाही नेतृत्वाला चालना देण्यासाठी आणि राजकीय नेतृत्वाची जबाबदारी घेण्यासाठी आजच्या तरुणांना विकसित आणि आकार देण्यासाठी स्थापन केली आहे.
मॉडेल इंटरनॅशनल लीडर्स मीट (MILM) हे एक व्यासपीठ आहे जिथे भारत भरातील ४० हून अधिक युवांना सार्वजनिक क्षेत्रात बोलण्याचे कौशल्य, संशोधन क्षमता आणि मुत्सद्देगिरी विकसित करण्याची संधी मिळाली. ज्यामुळे त्यांना एक चांगला नेता बनण्यास मदत होते. एम.आय.एल.एम चे उद्दिष्ट युवा नेत्यांना गुंतवून ठेवणे आणि विविध देशांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे आहे . “स्वच्छ उर्जेद्वारे हवामान बदलाशी मुकाबला करणे” हा या वर्षीचा अजेंडावर चा मुख्य विषय होता ज्या करता युवाना विविध देशाचे प्रतिनिधी म्हणून त्यांची भूमिका मांडणयाची संधी दिली गेली होती.
हे ही वाचा:
हिमवादळात अडकलेल्या पर्यटकांचे स्नो बाइकर्सने वाचवले प्राण
मुख्यमंत्री महोदय अजून किती जणांचे आवाज दाबणार?
आजपासून यांना मिळणार बूस्टर डोस
… म्हणून पंतप्रधान मोदींचा फोटो आता लस प्रमाणपत्रावर दिसणार नाही
प्रतिनिधींनी विविध देशांनी केलेल्या उपाययोजना मांडल्या आणि नाविन्यपूर्ण कल्पना मांडल्या. प्रतिनिधींनी सादर केलेल्या विविध ‘पोझिशन पेपरवर’ चर्चा करण्यात आली. या संमेलनामुळे आंतरराष्ट्रीय संबंधांची माहिती आणि समज आणि प्रत्यक्षात फरक करण्याची संधी मिळाली.
दुसऱ्या दिवशी, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष, डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या उपस्थितीत प्रतिनिधींनी प्रतिनिधित्व केलेल्या देशांशी सांस्कृतिक संबंध दृढ करण्यावर सादरीकरण केले. त्या वेळी बोलताना सहस्रबुद्धेजी म्हणाले या कॅम्पसमध्ये येण्याचा नेहमीच आनंद होतो. विद्यार्थ्यांशी संवाद- विविध विद्यार्थ्यांचे विविध दृष्टिकोन ऐकणे हा एक चांगला शिकण्याचा अनुभव होता. संवाद खूप महत्वाचे आहेत आणि आपल्याला खूप काही शिकायला मिळाले.
कोणत्याही देशाला भारतासोबत सांस्कृतिक संबंध का निर्माण करायचे आहेत हे समजून घेणे आवशक आहे . हे सॉफ्ट पॉवर वाढवण्यासाठी उपयोगात येते आहे. सॉफ्ट पॉवर खूप गंभीर आहे. भारत ही आध्यात्मिक लोकशाहीची राजधानी आहे. भारतात, उपासनेच्या प्रत्येक पद्धतीला परवानगी आहे आणि ती टिकवून ठेवली आणि वाढू दिली आहे . भारत हा सण, संस्कृती, भाषा, संगीत, पाककृती इत्यादींमध्ये विविधता असलेला देश आहे. शाश्वत विकास उद्दिष्टे सादर करण्यापूर्वी भारत मातृ निसर्गाशी असलेल्या संबंधांवर लक्ष केंद्रित करतो. भारत वसुदैव कुटुंबकम या कल्पनेला चालना देतो. हे आपल्या संस्कृतीला बळकटी देणारे मुख्य घटक आहेत.
विविध प्रतिनिधींनी सादर केलेल्या हवामान बदल रोखण्यासाठीच्या कृती आराखड्यावर चर्चा झाली. उद्योगपती श्रीकांत बडवे आणि डॉ. राजेश खरात, संचालक, स्कूल ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज, मुंबई विद्यापीठ हे पारितोषिक वितरण आणि समारोप समारंभाचे अतिथी होते. देवेंद्र पै यांनी एम.आय.एल.एम २०२२ चा अहवाल सादर केला. तन्मय सालोडकरला सर्वोत्कृष्ट प्रतिनिधी पुरस्कार मिळाला. अर्घिश अकोलकर याने सर्वोत्कृष्ट प्रतिनिधी उपविजेतेचा पुरस्कार पटकावला. मुंबईच्या के.ई.एस कॉलेजने सर्वोत्कृष्ट कॉलेज डेलिगेशनचा पुरस्कार पटकावला आणि एन.बी.टी कॉलेज, नाशिकने बेस्ट कॉलेज डेलिगेशन रनर अपचा किताब पटकावला.