गोराई किनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी सरसावले ‘आयआयडीएल’ चे विद्यार्थी

गोराई किनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी सरसावले ‘आयआयडीएल’ चे विद्यार्थी

भाईंदर जवळचा गोराई समुद्र किनारा हे अनेक पर्यटकांना आकर्षित करणारे ठिकाण. बेशिस्त पर्यटकांच्या वर्तनाने समुद्र किनाऱ्यावर कचऱ्याचे साम्राज्य तयार झालेले असते. पण या विरोधात आता रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या  ‘आयआयडीएल’ मधील विद्यार्थ्यांनी मोहीम छेडली आहे. यासाठी १४ फेब्रुवारी रोजी ‘आयआयडीएल’ च्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले आहे.

दरवर्षी 300 दशलक्ष टनांहून अधिक आणि दररोज 8 दशलक्ष टन कचरा हा समुद्रात सोडला जातो. प्लॅस्टिकच्या कचऱ्यामुळे समुद्री जीवसृष्टी खूप मोठ्या प्रमाणात धोक्यात आली आहे. समुद्री कचऱ्यातला 80 टक्के कचरा हा प्लॅस्टिक चा भाग आहे. समुद्री जीवसृष्टीचा श्वास कोंडल्या गेल्यामुळे आणि ती मृतावस्थेत गेल्यामुळे  त्याचा थेट परिणाम मानवाच्या आरोग्यावर होत आहे. वातावरण बदलामुळे आज आपण मृत्यूच्या उंबरठ्यावर आहोत, सीफुडचा दर्जा घसरतोय आणि त्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतोय. या परिस्थितीत बदल घडवायचा असेल तर पुढाकार घेऊन स्वच्छता मोहीमा राबवण्याची आवश्यकता आहे. हीच गरज लक्षात घेऊन गोराई किनाऱ्याच्या स्वच्छतेचा विडा तरुण विद्यार्थ्यांनी उचलला आहे.

या स्वच्छता मोहिमेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन ‘आयआयडीएल’ तर्फे करण्यात आले आहे. गोराई समुद्रकिनारी 14 फेब्रुवारी सकाळी 8 वाजता ही मोहीम सुरू होईल. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी अनुराग चौधरी: 9892698384, रितेश शेटिया: 8329924597 यांच्याशी संपर्क साधून अधिक माहिती मिळवता येऊ शकते. 

 

Exit mobile version