बांगलादेशात अजूनही हिंदू समाज भीतीच्या छायेत जगत आहे. हिंसाचाराच्या बातम्या येत नसल्या तरी हिंदुंवरील अत्याचाराच्या बातम्या सतत येत आहेत. इस्लामिक कट्टरपंथीयांनी आता थेट धमकीच दिली आहे. बांगलादेशात जर दुर्गापूजा करायची असेल तर ५ लाख रुपये द्यावे लागतील, अशी धमकी दिली जात आहे. खुलना जिल्ह्यातील अनेक हिंदू मंदिरांना निनावी नावांकडून अशी धमकीची पत्रे मिळाली आहेत, ज्यात जर पैसे दिले नाहीत तर दुर्गापूजा होऊ दिली जाणार नाही आणि त्यांना गंभीर परिणामांना देखील सामोरे जावे लागेल,असे लिहिले आहे.
ही पत्रे पोस्टाद्वारे हिंदू मंदिरांना पाठवण्यात आली आहेत. याबाबत प्रशासन आणि प्रसारमाध्यमांना माहिती दिल्यास त्यांचा शिरच्छेद केला जाईल, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. अवामी लीगचे जॉइंट सेक्रेटरी मेहबूब उल आलम हनिफ यांच्या घराप्रमाणेच पैसे न दिल्यास त्यांची घरे लुटली जातील, असेही सांगण्यात आले आहे.
पत्रात लिहिले आहे की, ऐका, जर तुम्हाला २०२४ मध्ये दुर्गापूजा करायची असेल तर तुम्हाला प्रत्येक मंदिरातून पाच लाख रुपये द्यावे लागतील. अन्यथा तुम्हाला कोणत्याही प्रकारे पूजा करता येणार नाही. तसेच आठवडाभरात सर्व पैसे तयार ठेवण्यास सांगितले आहे.
हे ही वाचा :
पंजाबमध्ये ट्रेन उलटवण्याचा कट, रुळावर सापडल्या ‘लोखंडी सळ्या’
अमेरिकेत मोदींच्या भाषणादरम्यान श्रोत्यांना काशी मथुरेच्या मंदिरांची आठवण
आपचे आमदार अमानतुल्ला खान यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
भारताचा कायापालट करून डिजिटल इंडियाचे नरेंद्र मोदींचे लक्ष्य
जर ही गोष्ट प्रशासन, पत्रकार किंवा इतर कोणाला सांगितल्या गेल्यातर कापून टाकण्याची धमकी पत्रातून दिली आहे. अल्लाहच्या नावाने, जर आम्हाला पैसे मिळाले नाहीत तर आम्ही तुमचे तुकडे करू. आम्ही तुमच्यावर लक्ष ठेवून आहोत, असे पत्रात म्हटले आहे. हे पत्र ९ सप्टेंबर २०२४ रोजी लिहिले आहे. आता ते हिंदू मंदिरे आणि पूजा समित्यांच्या अध्यक्ष आणि सरचिटणीसांना पाठवले जात आहेत.
हिंदू मंदिरांना हे पत्र मिळताच खुलना येथील चार वेगवेगळ्या मंदिर समित्यांनी दाकोप पोलिस ठाण्याशी संपर्क साधला आणि तक्रारी दाखल केल्या. या प्रकरणी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सिराजुल इस्लाम यांनी म्हटले की, अशा प्रकारची पत्रे कोणी लिहिली, कोठून आली याचा तपास सुरु आहे. मंदिरांच्या संरक्षणासाठी आम्ही प्रयत्न करू. लष्कराच्या तुकडीसह आम्ही पोलिस ठाण्यात नियमित गस्त घालत आहोत. दरम्यान, काही मंदिर समित्यांनी धोक्यामुळे दुर्गापूजेचे आयोजन न करण्याचा निर्णय घेतला आहे तर काहींनी शांततेत पूजा आयोजित करणार असल्याचे सांगितले आहे.