32 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरविशेषकसाबचे कौतुक करायचे असेल तर पाकिस्तानात जा!

कसाबचे कौतुक करायचे असेल तर पाकिस्तानात जा!

२६/११ दहशतवादी हल्ल्यातील साक्षीदाराचा काँग्रेसवर संताप

Google News Follow

Related

मुंबईमध्ये २६ नोव्हेंबर, २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अजमल कसाबच्या विरोधात साक्ष देणारी सर्वांत कमी वयाची साक्षीदार देविका रोटवान हिने महाराष्ट्राचे दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांच्या मृत्यूप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचे नाव न घेता सोमवारी देविकाने या प्रकारे जखमांवर मीठ चोळू नका, असे आवाहन केले. तसेच, कसाबचे कौतुक करायचेच असेल तर पाकिस्तानात जा, असे वक्तव्यही तिने केले.

महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी २६ नोव्हेंबर, २००८ रोजी दहशतवादी हल्ल्यादरम्यान करकरे यांचा झालेला मृत्यू कसाबच्या गोळीने नव्हे तर एका पोलिसाच्या गोळीने झाला होता, असा दावा केला आहे. तो पोलिस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित होता, असा आरोपही त्यांनी केला आहे. काँग्रेसनेते वडेट्टीवार यांनी मुंबई उत्तर मध्य मतदारसंघाचे उमेदवार उज्ज्वल निकम यांना लक्ष्य करून ही टीका केली होती. निकम हे दहशतवादी हल्ल्याच्या खटल्यात विशेष वकील होते.

हे ही वाचा:

‘लडकी हो तो पिटोगी, ही काँग्रेसची घोषणा’

विजयपुरा ऑनर किलिंग प्रकरणः हिंदू मुलाशी लग्न केल्याप्रकरणी गर्भवती मुस्लिम महिलेला पेटवून दिले!

प्रज्वलसारख्या लोकांसाठी झिरो टोलरेंस धोरण, कर्नाटक सरकारने दिली देश सोडण्याची परवानगी

इस्रायल- हमासमध्ये पेटलेलं युद्ध शमणार?

‘जर २६ नोव्हेंबरला कसाबने गोळी चालवली नाही, तर कोणी चालवली? कोणीही त्या दहशतवादी हल्ल्याला विसरू शकणार नाही. तुम्ही आमच्या जुन्या जखमा उकरून त्यावर मीठ चोळत आहात. जर तुम्हाला राजकारण करायचे आहे, तर दुसऱ्या विषयावर करा, यावर नको,’ अशी प्रतिक्रिया देविकाने दिली.२६ नोव्हेंबर, २००८ रोजी देविका वडील नटवरलाल आणि भाऊ आकाश यांच्यासोबत छत्रपती शिवाजी टर्मिनसवर रेल्वेची वाट पाहात होती. तेव्हा कसाब आणि त्याच्या साथीदाराने अंधाधुंद गोळीबार सुरू केला. देविकालाही गोळी लागली होती, त्यामुळे ती दीर्घकाळ कुबड्या घेऊन वावरत होती. इतकेच नव्हे तर ती कसाबच्या खटल्यात न्यायालयात साक्ष देणारी सर्वांत कमी वयाची साक्षीदार ठरली होती. त्यानंतर दहशतवाद्याला फाशीची शिक्षा दिली गेली.

‘जर त्यांना (वडेट्टीवार) पाकिस्तानचे समर्थन करायचे आहे, तर ते भारतात काय करत आहेत?,’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. निकम यांच्या विरोधातील आरोप खोटे असल्याचेही तिने स्पष्ट केले. ‘त्यांनी देशासाठी बरेच काही केले आहे आणि कसाबला फाशीवर चढवण्यासाठी मदत केली. निकम हे खोटे बोलले नाहीत किंवा ना त्यांनी फसवणूक केली,’ असेही ती म्हणाली. ते निवडणुकीच्या काळात अशा प्रकारची वक्तव्ये करत आहेत. त्यांना या देशात राहण्याचा अधिकार नाही, असे बोलून तिने वडेट्टीवारांना लक्ष्य केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा