ज्या लोकांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना ओबीसी प्रवगार्तून आरक्षण देण्यास आम्हाला विरोध नाही. मात्र, सरसकट मराठा समजला कुणबी प्रमाणपत्राची मागणी आम्हाला मान्य नाही.जर मराठा समाजाला कुणबीमधून आरक्षण पाहिजे असल्यास त्यांनी लंगोट घालून फिरायाची तयारी ठेवावी, अशी टिप्पणी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केली.सांगलीत पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.तसेच कोकणात आजही कुणबी हे लंगोट घालून फिरतात आणि मराठा समाजाची मागणी पाहिली तर त्यांना कुणबीमधून प्रमाणपत्र हवं आहे. तर त्यांनी अगोदर लंगोट घालून फिरावे. तसेच ते वस्तारा घेऊन फिरणार आहेत का? असा सवालही प्रकाश शेंडगे यांनी यावेळी उपस्थित केला.
ते म्हणाले, “सुरुवातीला त्यांची मागणी होती की, आम्हाला निजामाच्या काळातील नोंदी बघून कुणबी आरक्षण द्यावं. तेवढीच त्यांची मागणी होती. ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांना ओबीसी आरक्षण द्यावं हे आम्ही मान्य केलं होतं. एखादा असेल निजाम काळातला, निजाम काळातल्या पावणे दोन कोटी नोंदी तपासल्यानंतर फक्त ११ हजार नोंदी सापडल्या. त्यानंतर त्यांनी परत भूमिका बदलली. पूर्ण महाराष्ट्रात सरसकट ओबीसी आरक्षण पाहिजे. हे आम्हाला अजिबात मान्य नाही”, असं प्रकाश शेंडगे म्हणाले.
हे ही वाचा:
‘वाँटेड’ गुन्हेगारांनी भारतात या आणि कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जा!
पुतिन यांच्याकडून मोदींचे कौतुक; ‘भारताच्या हितरक्षणासाठी मोदी कठोर भूमिका घेतात’
तब्बल अडीच वर्षाने परतली टी-४२ वाघीण!
तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर पाय घसरून पडले, पंतप्रधान मोदींनी बरे होण्यासाठी दिल्या शुभेच्छा!
“कुणबी म्हणजे सामाजिक मागासलेले आहेत. यांचं कुणीही लंगोटी घालून फिरत नाही. तुम्ही आताही कोकणात गेलात तर आजही कोकणात कुणबी लंगोटी घालून फिरताना दिसेल. मग हे लंगोटी घालायला तयार आहेत का? तुम्हाला कुणबी आरक्षण हवं असेल तर दहा वर्ष लंगोट घालायला तुम्ही तयार आहात का? आमचा नाभिक समाज पिढ्यांपिढ्या सामाजिक भोग भोगतोय. मग आम्हाला कुणबी आरक्षण मिळालं. यांचे भोग तुम्ही भोगणार आहात का? तुम्ही हातात वस्तरा घेणार आहात का? नाही घेऊ शकतं. तुम्ही उच्च समाजातील आहात. तुम्ही क्षत्रिय आहात. मग तुम्ही कुणबी आरक्षणात कशाला येताय?”, असा सवाल प्रकाश शेंडगे यांनी केला.