26 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेषख्रिसमससाठी सांताक्लॉज बनून डिलीव्हरी करता तर, हिंदू सणांच्यावेळी भगव्या रंगाचा पोशाख घालून...

ख्रिसमससाठी सांताक्लॉज बनून डिलीव्हरी करता तर, हिंदू सणांच्यावेळी भगव्या रंगाचा पोशाख घालून जाता का?

हिंदू जागरण मंचाच्या सदस्याचा झोमॅटोच्या डिलीव्हरी बॉयला सवाल; व्हिडीओ व्हायरल

Google News Follow

Related

बुधवार, २५ डिसेंबर रोजी देशासह जगभरात ख्रिसमसच्या निमित्ताने उत्साह दिसून येत होता. अनेक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. झोमॅटोच्या एका डिलीव्हरी बॉयला नाताळाच्या निमित्ताने घातलेले सांताक्लॉजचे कपडे काढायला लावल्याचा हा व्हिडीओ आहे. सांताक्लॉजचे कपडे घालून हा तरुण काम करत असताना हिंदू जागरण मंचाच्या सदस्याने त्याला हटकले आणि त्याची चौकशी करत त्याला सांताक्लॉजचे कपडे काढून ठेवण्यास सांगितले.

संबंधित व्हिडीओ हा मध्य प्रदेशच्या इंदौर शहरातला असल्याची माहिती आहे. तर, डिलीव्हरी बॉयला कपडे काढायला लावणारे सदस्य हे हिंदू जागरण मंच या संघटनेचे असल्याचे बोलले जात आहे. या व्हिडीओ दिसून येत आहे की, ते सदस्य त्याला म्हणतात, “सांताक्लॉज बनून डिलीव्हरी ऑर्डर करायला जाताय का? ख्रिसमस आहे म्हणून हे आहे का? मग कधी दिवाळी वगैरेच्या दिवशी प्रभू श्रीरामांचा किंवा भगव्या रंगाचा वेश करून लोकांच्या घरी जाता का तुम्ही? या ऑर्डर जास्त करून हिंदू लोकच मागवतात. कारण इतर लोकांची संख्या एवढी नाही. त्यामुळे कधी आपले सण येतील तेव्हा भगवे कपडे घालून वगैरे जात जा ना. हे सांताक्लॉज बनून आपण कुटुंबांना काय संदेश देत आहोत? आपण हिंदू आहोत. सांताक्लॉजचे कपडे घालून काय संदेश देतोय आपण? सांताक्लॉज बनून जाणं गरजेचं आहे का? घरोघरी जाताना भगतसिंग व्हा, चंद्रशेखर आझाद व्हा,” असं ती व्यक्ती डिलीव्हरी बॉयला सांगत आहे.

हे ही वाचा : 

सुप्रिया सुळे म्हणतात, मी यापूर्वी चार निवडणुका ईव्हीएमवर जिंकल्या

राहुल गांधी मस्साजोग न जाण्याची ही आहेत कारणे…

विनोद कांबळी म्हणाला, ही चूक पुन्हा होणार नाही!

अरविंद केजरीवाल यांना घरचा अहेर, महिला सन्मान योजनाच अस्तित्वात नसल्याचा गौप्यस्फोट

यावर डिलीव्हरी बॉय म्हणतो की, “असं काही नाही, कंपनीनं आम्हाला हे घालायला सांगितलं आहे. काही लोकांना दिले आहेत असे कपडे.” शेवटी या डिलीव्हरी बॉयने सांताक्लॉजचे कपडे काढले. यानंतर हे सर्व सदस्य तिथून निघून गेले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा