उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा गरळ ओकण्याचे काम केले आहे.औरंगजेब पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीत उतरला असून पंतप्रधान मोदींची तुलना औरंजेबाशी केली आहे.पंतप्रधान मोदींवर वादग्रस्त विधान केल्याने संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका होत आहे.भाजप आमदार नितेश राणे यांनी तर थेट इशाराच दिला आहे.नितेश राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांचा कारभार टिपू सुलतान पेक्षा काही कमी न्हवता.जर पुन्हा पंतप्रधान मोदींबद्दल बेताल वक्तव्य कराल तर औरंगजेबाच्या बाजूला अन्य दोन कबरी खोदाव्या लागतील.
आमदार नितेश राणे म्हणाले, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे हनिमून ट्रॅव्हल्सवर राज्यभर निघाले आहेत.जिथे-जिथे जात आहेत तिथे-तिथे ते ओकण्याचे काम करत आहेत.
हे ही वाचा:
आरोपी साजिदची आई म्हणाली, एन्काउंटरमध्ये मुलाच्या मृत्यूचे दु:ख नाही!
नेमकं काय भोवलं ? राजकीय असंग की मनसुखच्या पत्नीचे शाप?
तुम्ही उतरलात तरी घडायचे तेच घडणार !
पोल बाँड्सने राजकारणातील काळा पैसा संपवला
संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींची तुलना औरंगजेबाशी केली.तर मग संजय राऊतांना देखील मी सांगेन की, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना जो काही त्यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात कारभार केला, तो टिपू सुलतान पेक्षा काही कमी न्हवता.
ज्या पद्धतीने टिपू सुलतानने हिंदूंचा द्वेष केला, सतत हिंदूंविरुद्ध षडयंत्र रचलं.तशाच पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात…जेवढा दाढी कुरवाळण्यामध्ये वेळ घालवला तेवढा कुठल्याच मंत्र्यांने वेळ घालवला नसेल.म्हणून पुन्हा जर पंतप्रधान मोदींना औरंगजेबाची तुलना केली तर औरंजेबाच्या कबरीच्या बाजूला अन्य दोन कबरी खोदून ठेवाव्या लागतील.. हे लक्षात ठेवा, असा इशारा नितेश राणे यांनी संजय राऊतांना दिला आहे.