मुस्लीम असाल तर खरे नाव लिहा, नाहीतर दुकान बंद केले जाईल!

भाजप नेत्याकडून हिंदूंच्या नावावर चालवणाऱ्या मुस्लीम दुकानदारांची कानउघाडणी

मुस्लीम असाल तर खरे नाव लिहा, नाहीतर दुकान बंद केले जाईल!

देशात अनेक ठिकाणी व्यापारासाठी मुस्लीम समाजच्या काही लोकांकडून हिदुंच्या नावाचा वापर केला जात असल्याचे समोर येत आहे. अशाही घटना समोर आल्या आहेत, ज्यामध्ये मुस्लीम समाजातील लोकांकडून खाद्य, पेयामध्ये थुंकणे, मानवी मूत्राचा समावेश केल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे अशा लोकांची दुकाने हिंदूंच्या नावाने असतात, मात्र मूळ मालक, कामगार मुस्लीम समाजाचे असतात. अशी फसवेगिरी, भेसळपणा रोखण्यासाठी आणि नागरिकांना सतर्क करण्यासाठी विविध हिंदू संघटना,भाजपा काम करत आहे. अशीच एक घटना दिल्लीमधून समोर आली आहे. ज्या ठिकाणी मुस्लीम मालक आपला व्यवसाय करण्यासाठी हिंदूंच्या नावाचा वापर करत असल्याचे समोर आले आहे.

भाजपा नेते रविंदर सिंह नेगी यांनी याचा पर्दाफाश केला आहे. दिल्लीतील पटपड़गंज विधानसभा मतदारसंघात रविंदर नेगी यांनी फेरफटका मारला, ज्यावेळी त्यांना दुकानावर हिंदूंच्या नावाच्या पाट्याचा वापर दिसला. मात्र चौकशी केली असता दुकानाचे मूळ मालक हे मुस्लीम समाजाचे असल्याचे निदर्शनास आले.

हे ही वाचा : 

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर इडीकडून गुन्ह्याची शक्यता

राज्यात गायी राज्यामाता-गोमाता; पोषणासाठी मिळणार अनुदान

अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर!

धारावीतील मशिदीचे अनधिकृत बांधकाम काढण्यास सुरुवात!

भाजप नेत्याने अशा दुकानदार मालकांची भेट घेवून, मुस्लीम असाल तर दुकानावर खरे नाव टाका, अन्यथा दुकान बंद केले जाईल, अशी थेट धमकीच दिली. हिंदूंच्या नावाच्या दुकानांवरील पाट्या काढून स्वतःच्या नावाच्या पाट्या लावण्याचे त्यांनी सांगितले. या घटनेचा व्हिडीओ शूट करून रविंदर नेगी यांनी ट्वीटरवर पोस्ट केला आहे. यामध्ये स्पष्ट दिसून आले की, दुकानाचे नाव रावल डेरी (मालक- मो अयान), तोमर डेरी (अलतमस ), हरियाणा पनीर भंडार (मो-रिजवान), गुप्ता ज्यूस (मो-यामीन) अशी अनेक दुकाने समोर आली आहेत, ज्याचे मूळ मालक मुस्लीम आहेत.

आमची कोणत्याही धर्माशी लढाई नाही, जे लोक दुकानावर खोट्या नावाचा वापर लोकांची दिशाभूल करत आहेत, त्यांच्याशी आमची लढाई असल्याचे भाजपा नेते रविंदर सिंह नेगी यांनी सांगितले.

Exit mobile version