औरंगाबादमध्ये लसीकरण प्रमाणपत्र दाखवा, मगच वस्तू विकत घ्या!

औरंगाबादमध्ये लसीकरण प्रमाणपत्र दाखवा, मगच वस्तू विकत घ्या!

संपूर्ण लसीकरण हळूहळू होत असले तरी अजून ते १०० टक्के झालेले नाही. मात्र औरंगाबादमध्ये लस घेतलेल्यांनाच वस्तू विकत घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे. दुकानात वस्तू विकत घ्यायची असेल तर अगदी दारूही विकत घ्यायची तरी लस घेणे अनिवार्य आहे.

सध्या औरंगाबादमध्ये लसीकरणाचे प्रमाण ६४ टक्के आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने लसीकरण करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे औरंगाबाद शहरात किराणा सामान, कपडे, पेट्रोल, गॅस किंवा अन्य वस्तू आणण्यासाठी गेलात, हॉटेलमध्ये जेवणासाठी, फिरायला गेलात तरी तुमच्याकडे लसीकरणाचे प्रमाणपत्र हवे. ते दाखविल्यानंतरच वस्तू दिल्या जाणार आहेत. दारू विकत घेण्यास गेल्यासही असे प्रमाणपत्र दाखविणे बंधनकारक आहे.

औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी विविध ठिकाणी लसीकरण प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. त्यात पेट्रोल पंप, गॅस एजन्सी, मॉल, छोटी दुकाने, कृषी उत्पन्न बाजार समिती यांचा समावेश आहे. आता २२ नोव्हेंबरपासून ऑटो, ट्रॅव्हल्स, खासगी वाहने, यांनाही लसीकरणाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 

हे ही वाचा:

टोमॅटोने गाठली शंभरी!

नवी मुंबईतील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अध्यक्ष मागत होता खंडणी, गुन्हा दाखल

आयसीस काश्मीरकडून गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी

पायधुनीत होता भारतीय बनावट नोटा छापण्याचा कारखाना !

 

याची व्याप्ती आणखी वाढविण्यात आली असून आता मेडिकल, दवाखाने, रक्तपेढ्या, किराणा मालाची दुकाने, भोजनालये, ढाबे, खानावळी, खाद्यसेवा याठिकाणी असलेले कर्मचारी आणि ग्राहक हे लसीकरण केलेले असावेत, असा दंडक करण्यात आला आहे. दारूच्या दुकानांमध्येही लसीकरण असल्याशिवाय, विक्री करता येणार नाही. मराठवाड्यात लसीकरणाचा टक्का कमी असल्याने हे नवे निर्बंध घालण्यात आले आहेत. याची अंमलबजावणी इतर जिल्ह्यातही करता येईल का, याविषयी आता विचार सुरू आहे.

 

Exit mobile version