26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषमराठी माणसाबाबत पुन्हा असं घडलं तर गालावर वळ उठतील!

मराठी माणसाबाबत पुन्हा असं घडलं तर गालावर वळ उठतील!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा इशारा

Google News Follow

Related

मुंबईतील मुलुंडमध्ये मराठी महिलेला कार्यालयासाठी जागा नाकारल्याच्या प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “महाराष्ट्रात असं पुन्हा घडलं तर गालावर वळ उठतील हे निश्चित,” असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे. सोबतच सरकारने पण धाक दाखवला पाहिजे, असा सल्ला देखील त्यांनी दिला.

 

मुंबईच्या मुलुंड पश्चिमेकडील परिसरात एका सोसायटीत मराठी असल्यामुळे तृप्ती देवरुखकर या महिलेला कार्यालयासाठी जागा नाकारल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवार, २८ सप्टेंबर रोजी समोर आला होता. संबंधित महिलेने यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट टाकल्यानंतर मनसेने त्याची दखल घेऊन या सोसायटीच्या सेक्रेटरींना समज दिली होती. शिवाय त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे. याप्रकरणी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे मैदानात उतरले.या संपूर्ण प्रकरणावर राज ठाकरे यांनी ट्वीट करुन प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा:

कुख्यात गुंड आतिकच्या भावाच्या बेनामी संपत्तीची रहस्ये उलगडली

तरुणाने आत्महत्येचे पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी त्याला हेरले!

‘कॅनडा म्हणजे मारेकऱ्यांचा गड’!

राजस्थानमध्येही भाजपकडून नव्या चेहऱ्यांना संधी?

राज ठाकरे ट्विट मध्ये म्हणाले, मुंबईत, मुलुंडमध्ये एका मराठी स्त्रीला, ती मराठी आहे म्हणून व्यवसायासाठी जागा नाकारल्याची घटना समोर आली. इतरांनी निषेध वैगरे व्यक्त केला. आम्हाला निषेध नोंदवणं इत्यादी प्रकार माहित नाहीत. त्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आमच्या पद्धतीने दम दिल्यावर त्या बिल्डिंगच्या सचिवाने माफीनामा दिला.हे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. मुंबईत, महाराष्ट्रात जर पुन्हा हे असं काही घडलं तर गालावर वळ उठतील हे निश्चित. आणि सरकारने पण जरा आपला धाक दाखवला पाहिजे.

काल मुलुंडमध्ये माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जाऊन जी समज दिली त्यांचं मनापासून अभिनंदन. तुमचं कायम लक्ष असतंच आणि मराठी माणसावर कुठेही अन्याय झालं तर त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच आठवते. हे असंच सुरु राहिलं पाहिजे.अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे !, असे ट्विट करत इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.दरम्यान या सगळ्या प्रकारातील पीडित महिला तृप्ती देवरुखकर या राज ठाकरे यांनी भेट घेण्यासाठी मुंबईतल त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाल्या आहेत. इथे त्या शर्मिला ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं माहिती आहे.तर, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांनी माझ्याबाबतही असाच प्रकार घडल्याची धक्कादायक माहिती दिली आहे.

तथापि, तृप्ती देवरुखकर यांनी कार्यालयासाठी जागा नाकारल्या प्रकरणी बुधवारी रात्री उशिरा मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आरोपीविरोधात कलम ३४१, ३२३, ५०४ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. मुलुंड पोलिसांनी यातील दोन्ही आरोपी प्रवीण ठक्कर आणि निलेश ठक्कर यांना रात्री ताब्यात घेतलं आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा