23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषव्होट जिहादकरून मतं मागतील तर मतांचं धर्मयुद्ध करावे लागेल, नाहीतर जगू देणार...

व्होट जिहादकरून मतं मागतील तर मतांचं धर्मयुद्ध करावे लागेल, नाहीतर जगू देणार नाहीत

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विरोधकांवर टीका

Google News Follow

Related

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज (१७ नोव्हेंबर) नाशिकमध्ये सभा पार पडली. यावेळी महायुतीने नाशिकमध्ये केलेल्या कामाचा पाढा वाचत अडीच वर्षात काहीच काम न केलेल्या मविआसरकारवर टीका केली. यावेळी मौलाना नोमानी यांच्या मागण्यांचा उल्लेख करत मविआला घेरले. तसेच व्होट जिहादकरून काही लोक मतं मागणार असतील तर आपल्या मतांचं धर्मयुद्ध करावे लागेल, नाहीतर हे जगू देणार नसल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.

आगामी काळात नाशिकमध्ये आयटी पार्क आणण्याचे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांच्या सशक्ती करणासाठी महायुती सरकार प्रयत्नशील आहे. मुलींच्या शिक्षणासाठी चार-पाच लाख फी असली तर मुलींचे शिक्षण मोफत करण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला. महिलांसाठी एसटी प्रवासात ५० टक्के सवलत, लाडकी बहिण योजना आणल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले, मार्केटमध्ये सावत्र भाऊ देखील फिरत आहेत, ते उबाठा, राष्टवादी तुतारी, पंजे वाले आहेत. हे सर्व कोर्टात जाऊन ही योजना म्हणजे ‘पैशांचा चुराडा आहे, योजना बंद करा’, अशी मागणी केली. मात्र, आम्ही बाजू मांडली आणि ही योजना बंद होणार नसल्याचे कोर्टाने म्हटले. आता पुन्हा सरकार आले तर १५०० ऐवजी २१०० देणार.

हे ही वाचा : 

आदिवासी बांधवांच्या जमिनी हडपणाऱ्यांना हद्दपार करा!

पंतप्रधान मोदींकडून ‘द साबरमती रिपोर्ट’चे कौतुक, म्हणाले- ‘सत्य बाहेर येत आहे’

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आणखी एकाला अटक

केजरीवालांना धक्का, मंत्री कैलाश गेहलोतांचा पदाचा राजीनामा, पक्षही सोडला

एकीकडे आम्ही महिलांसाठी, समाजासाठी काम करत आहोत तर दुसरीकडे उबाठा, तुतारीवाले ध्रुवीकरण करत आहेत, व्होट जिहाद म्हणत आहेत. आमच्या सरकारने सर्व जातीय महिलांना योजनेचे पैसे वाटप केले. व्होट जिहाद करून पाडण्याची योजना आखत आहेत.

ते पुढे म्हणाले, मौलाना नोमानी यांनी १७ मागण्याचे पत्र मविआला दिले आहे. यातील एक मागणी खतरनाक आहे ती म्हणजे, महाराष्ट्रामध्ये २०१२ ते २०२४ दरम्यान जेवढ्या दंगली झाल्या, त्यातील मुस्लीम आरोपींचे खटले वापस घ्या आणि हिंदूवरचे खटले तसेच ठेवा. विशेष म्हणजे, या सर्व १७ मागण्या मान्य करत लेखी स्वरूपात मविआने आश्वासन दिले आहे.

जर व्होट जिहादकरून काही लोक मतं मागणार असतील तर आपल्या मतांचं धर्मयुद्ध करावे लागेल. आता वेळ आली आहे, आज जागला नाहीत तर तुम्हाला हे जगू देणार नाहीत, आज वाचणार नाहीत तर वाचू शकणार नाहीत. ही निवडणूक तुमच्या अस्तित्वाची आहे, त्यामुळे भाजपच्या उमेदवाराला मतदान करून यांचे नापाक इरादे दफन करून टाका, असे आवाहन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा