भाजपा-महायुती आहे तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे!

पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यात पार पडली सभा 

भाजपा-महायुती आहे तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे!

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज (१२ नोव्हेंबर) महायुतींच्या उमेदवारांसाठी पुण्यामध्ये सभा पार पडली. यावेळी सभेमधील लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आणि त्यांच्या आईंचे चित्र रेखाटलेले दाखवले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ते चित्र गोळा करण्यास सांगीतले आणि त्याच्या पाठीमागे त्यांचे नाव टाकण्यास सांगितले, नंतर तुम्हाला पत्र पाठवेन, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, सभेला येताना रस्त्यावरील लोकांची गर्दी पाहून महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन होणार हे स्पष्ट आहे. पुण्यासह राज्यामध्ये झालेल्या, सुरु असलेल्या विकास कामांची माहिती यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली.

विरोधकांवर टीका करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, महायुतीच्या सरकार पूर्वी मागील सरकारकडे सांगण्याइतके एकही काम नाही. आमचे काम थाबवण्यात यांची अडीच वर्षे निघून गेली. ‘भाजपा-महायुती आहे तर गती आहे आणि महाराष्ट्राची प्रगती आहे,’ असे पंतप्रधान मोदींनी म्हटले.

हे ही वाचा : 

भाजपाने पक्ष फोडलेच नाहीत, ठाकरेंनी काँग्रेसशी हातमिळवणी करताच पक्षाने उठाव केला!

हैद्राबादच्या निजामाचे अत्याचार, कुटूंबाचा त्याग खर्गे मतांसाठी विसरून गेले!

महाराष्ट्रात १९९५ नंतर हे प्रथमच घडते आहे…

निवडून येण्याचे आव्हान वाटत नाही, पाय जमिनीवरच, लोकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे विजय निश्चित!

कर्नाटकमध्ये अनेक घोटाळे समोर येत आहेत. कर्नाटकामध्ये काँग्रेस जनतेला उघडपणे लुटत आहे. लुटलेला हा पैसा महाराष्ट्राच्या निवडणुकीवर खर्च केला जात असल्याचा असा आरोप असल्याचे पंतप्रधांनानी म्हटले. महाराष्ट्राला वाचवायचे असेल तर काँग्रेस नावाच्या आपत्तीला लांब ठेवायचे आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी कलम-३७०, संविधानाचा उल्लेख करत काँग्रेसवर जोरदार टीका केली.

६०-७० वर्षे जम्मू-काध्मीरमध्ये बाबा साहेबांचे संविधान लागू न्हवते. मात्र, जनतेने जेव्हा मोदीला सेवा करायची संधी दिली तेव्हा त्याठिकाणी भारताचे संविधान लागू झाले. कलम-३७० ला जमिनीत गाढून टाकले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धर्तीवर काँग्रेस त्यांचा अपमान करत आहे. हे लोक वीर सावरकरांना शिव्या देतात, बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलताना यांच्या तोंडावर टाळा लागतो. जर त्यांच्यात दम असेल तर त्यांनी आपल्या युवराजच्या तोंडून वीर सावरकर, बाळासाहेब ठाकरेंची स्तुती बोलून दाखवावी. यावेळी काँग्रेसवर जोरदार टीका करत महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

 

Exit mobile version