विरोधकांनी राजकारण करायचे ठरवले तर राजकीयच उत्तर मिळणार

मुख्यमंत्री फडणवीसांकडून विरोधकांचा खरपूस समाचार

विरोधकांनी राजकारण करायचे ठरवले तर राजकीयच उत्तर मिळणार

नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस. याच दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल (१५ डिसेंबर) आव्हान केले होते कि विरोधकांनी माध्यमांमध्ये नाहीतर विधिमंडळात येवून चर्चा करावी. मुख्यमंत्र्यांच्या आव्हानावर विरोधकांनी आरोप केला की, सरकार चर्चेपासून पळत आहे. विरोधकांच्या आरोपावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. नागपुरात झालेल्या आजच्या (१६ डिसेंबर) पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अंबादास दानवे अथवा अन्य विरोधकांनी महत्वांच्या विषयांवर चर्चा करावी, यासाठी सरकार तयार आहे. सरकारकडून कोणतीही बाजू लपवण्यात येणार नाही. मात्र, विरोधकांनी केवळ राजकारण करायचे ठरवले तर मग राजकीयच उत्तर मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मंत्री मंडळात स्थान न मिळाल्याने सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याची चर्चा आहे. यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ते जेष्ठ नेते आहेत, त्यांच्याशी चर्चा झाली आहे. पक्षाने काही नेत्यांना मंत्रीमंडळामध्ये न घेण्याच्या पाठीमागे त्यांना विशिष्ठ जबाबदारी देण्याचा मानस तयार केलेला आहे. पक्ष आणि सरकार दोन्ही चालवायच्या असतात. काही वेळी सरकारमध्ये काम करणारे पक्षांमध्ये काम करतात तर पक्षांमध्ये काम करणारे सरकारमध्ये. केंद्रीय पक्षाने काही विचार करूनच त्यांना मंत्री मंडळामध्ये घेतलेले नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करून जपानमध्ये ईव्हीएम बंद आहे, इथे का नाही, असा सवाल उपस्थित केला आहे. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जितेंद्र आव्हाड मनात येईल ते बोलतात, त्यांना कोणताही पुरावा लागत नाही. त्यांना उत्तर देण्यासाठी त्यांच्यासारखी माणसे आहेत, त्यांना उत्तर विचारा, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा : 

दाऊदच्या दानिश चिकनाला ड्रग्स प्रकरणात डोंगरीतून अटक!

ईव्हीएमच्या मुद्द्यावरून ओमर अब्दुल्लानंतर तृणमूलही काँग्रेसविरोधात

योगी की कुर्बानी दे दूंगा…

दगडफेक करणाऱ्यांना सोडणार नाही!

 

 

Exit mobile version