दिल्लीत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान, राष्ट्रीय लोकशाही पक्षाचे नागौरचे खासदार हनुमान बेनिवाल यांनी दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसच्या बांधकामातील त्रुटींची गणना केली. तसेच कंत्राटदार-अधिकाऱ्यांवर करण्यात आलेली कारवाई आणि अंतिम तपासणी अहवालाची अंतिम मुदत याबाबत विचारणा केली. यावर केंद्रीय रस्ते व परिवहन नितीन गडकरी यांनी उत्तर देत ‘ठेकेदाराने योग्य काम केले नाही तर त्याला बुलडोझरखाली टाकू’ असा इशारा दिला.
वास्तविक, हनुमान बेनिवाल यांनी दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर १५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी एकट्या दौसामध्ये ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे यावर प्रश्न उपस्थित करत कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई आणि अंतिम तपासणी अहवाल बाबत परिवहन मंत्र्यांना विचारणा केली.
यावर उत्तर देताना मंत्री नितीन गडकरी म्हणाले, हा देशातील सर्वात लांब एक्स्प्रेस वे आहे आणि जागतिक स्तरावर हा सर्वात कमी वेळात बांधला गेला आहे. यासाठी एक लाख कोटी रुपये इतका खर्च आला आहे. याद्वारे मुंबईहून दिल्लीला १२ तासांत पोहोचता येणार असून हे अंतर २०० किमीने कमी झाले आहे. ते पुढे म्हणाले, रस्त्याच्या बांधकामातील थरामध्ये फरक आहे, परंतु सामग्रीमध्ये कोणताही खोडसाळपणा झालेला नाही.
हे ही वाचा :
बिहार : इन्स्पेक्टर खानने मदतीची गरज असलेल्या महिलेचा केला विनयभंग
बाबर, बांगलादेश आणि संभलमधील समाजकंटकांचा डीएनए एकच!
मालदामधील हॉटेलमध्ये बांगलादेशींना प्रवेश बंदी!
‘इंडी’च्या खासदारांनी अदानींविरोधातील केलेल्या आंदोलनात तृणमूल काँग्रेस गायब!
काही ठिकाणी लेयर कम्प्रेशनचा मुद्दा त्यांनी मान्य केला. याबाबत ते म्हणाले, आम्ही ते दुरुस्त करण्यास सांगितले आणि ते दुरुस्त करण्यात आले आहे. या प्रकरणी चार कंत्राटदारांना जबाबदार धरले असून नोटीस देऊन त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.
ते पुढे म्हणाले, ज्याप्रमाणे आमच्या विभागाने ७ जागतिक विक्रम केले आहेत, त्याचप्रमाणे लोकांना निलंबित करणे, काम न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकणे अशा कारवाया मोठ्या प्रमाणावर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कंत्राटदाराने निकृष्ट काम केल्यास त्याला ६ महिने किंवा एक वर्ष टेंडर भरता येणार नाही, असे धोरण आम्ही तयार केले आहे. तसेच अधिकाऱ्यांना नोटीस देऊन निलंबित करण्याचे काम करू. ते पुढे म्हणाले, मला त्याचा उल्लेख करायचा नाही, सार्वजनिक सभांमध्ये मी बोललो आहे की, जर ठेकेदाराने नीट काम केले नाही तर त्याला बुलडोझरखाली टाकू.