सुप्रिया सुळेंचे उत्पन्न अडीच लाखांच्या आत असेल तर त्यांनाही १५०० रु. देऊ!

मंत्री अनिल पाटील यांची मविआवर जोरदार टीका

सुप्रिया सुळेंचे उत्पन्न अडीच लाखांच्या आत असेल तर त्यांनाही १५०० रु. देऊ!

सुप्रिया सुळे यांचे उत्पन्न २.५ लाखांच्या लाखांचा आत असेल तर त्यांनाही राज्य सरकार लाडकी बहिण योजनेचे १५०० रुपये देईल, असे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले. राज्यामध्ये मविआचे सरकार आले तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद पाडतील. शेतकऱ्यांना मोफत मिळणारी वीज देखील ते बंद पाडतील, असे मंत्री अनिल पाटील म्हणाले. नंदुरबारमध्ये बोलत असताना त्यांनी मविआवर जोरदार टीका केली.

मंत्री अनिल पाटील म्हणाले की, सरकार महिलांना लाच देत नसून भाऊबीजेची ओवाळणी देत आहे. उद्धव ठाकरे यांना बहिणीला दिलेली ओवाळणीला लाच म्हणून ते तमाम महाराष्ट्रातील महिलांचा अपमान करत आहे, शेतकऱ्यांना वीज मोफत देण्याचा निर्णय आम्ही घेतला. मात्र, मविआचे सरकार आल्यानंतर तो निर्णय मागे घेतला जाईल. राज्यातला शेतकरी असेल युवक असेल, युवती असतील महिला असतील हेच सरकार परत आणण्यासाठी जबाबदारीने काम करतील, असे मंत्री अनिल पाटील म्हणाले.

हे ही वाचा :

खेडगल्लीचा विघ्नहर्ता नाबाद ७५

‘खटाखट’ सारखी योजना नसून आमची ‘फटाफट’ सारखी योजना !

इराणपासून चीनपर्यंत केवळ एकच सुदृढ लोकशाही, ती म्हणजे “भारत”

तीन रोहिंग्या अटकेत.

दरम्यान, आज पुण्यामध्ये ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यंमत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाला संबोधित करताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. १ कोटी ३ लाख महिलांच्या खात्यामध्ये ३,००० हजार रुपये प्रत्येकी खात्यामध्ये पोहोचले असल्याची माहिती त्यांनी दिली. उर्वरित महिलांच्या खात्यामध्ये लवकरच पैसे येतील, जो पर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे येत नाहीत तो पर्यंत योजना बंद होणार नाही, हा आमचा निर्धार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

Exit mobile version