अंधारेबाई तर तुमच्या कानाजवळ डी जे वाजवू!

महाराष्ट्र राज्याच्या मनसे सरचिटणीस शालिनीताई ठाकरे यांचा सुषमा अंधारेंना इशारा

अंधारेबाई तर तुमच्या कानाजवळ डी जे वाजवू!

नुकताच संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात गणेशोत्सव पार पडला. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिरवणुकांमधील डीजे,डॉल्बीच्या दणदणाटावर बोट भाष्य केलं होत.यावर ठाकरे गटाच्या महिला नेत्या सुषमा अंधारे यांनी नाव न घेता राज ठाकरे याना टोला लगावला होता.त्यानंतर मनसे महिला नेत्या शालिनी ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत सुषमा अंधारेंना इशारा देत म्हणाल्या, संबंध नसताना राज ठाकरे यांच्या नातवाला राजकारणात ओढाल तर तुमच्या कानाजवळ डि.जे. वाजवू.

गणेश उत्सवाच्या मिरवणुकीत डीजे,डॉल्बीचा कर्कश आवाजामुळे कानाच्या पडद्यांना होणारा त्रास तसेच हृदय बंद पडून मृत्यू होण्याचे प्रकार वाढले आहे.मिरवणुकीच्या दरम्यान लेझर लाईटमुळे अनेकांची दृष्टी जाणं हे प्रकार वाढले आहेत.हा प्रकार गंभीर असल्याचे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट केले होते.त्यावरून ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या महिला नेत्या सुषमा अंधारे यांनी नाव न घेता राज ठाकरेंना टोला लगावला होता.डॉल्बीच्या आवाजामुळे कानाचे प्रॉब्लेम्स लेझर लाईटमुळे होणारा डोळ्यांना त्रास हा पहिल्या पासून सुरु आहे. मात्र, एका बड्या नेत्याच्या घराखालून गणपतीची मिरवणूक गेली असेल त्यामुळेत्यांच्या नातवाला त्रास झाला असेल या कारणास्तव हा मुद्दा उपस्तिथ केला असावा, असे नाव न घेता राज ठाकरेंना टोला अंधारे यांनी लगावला होता.

हे ही वाचा:

‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’च्या आयुष्याची कहाणी उलगडणार मोठ्या पडद्यावर

गतविजेत्या इंग्लंडची अपयशी सलामी

संजय सिंह यांची अटक वॉरंटशिवाय अथवा कारणाशिवाय नाही

खिचडी घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांच्या धाकट्या भावाला समन्स

सुषमा अंधारे यांच्या वक्तव्यावर मनसे महिला नेत्या शालिनी ठाकरे मैदानात उतरल्या.शालिनी ठाकरे यांनी सुषमा अंधारेंच्या कानाजवळ डि.जे.वाजवू असे ट्विट करत इशारा दिला.त्या म्हणाल्या, हिंदू सण उत्साहाने साजरे झाले पाहिजेत यासाठी राज साहेबांनी अनेकदा भूमिका घेतली आहे.मात्र, हिंदू सणांमध्ये डी.जे. आणि लेजर लाइटमुळे होणारा त्रास याबाबतही रोखठोक भूमिका घेऊन त्यास विरोध केला.यावर महाराष्ट्रातील जनतेने आणि इतर पक्षांनी देखील याचे स्वागत केले होते.मात्र, ही बाब तुमच्या लक्षात आली नसावी.

सध्या मराठीबाबत तांडव सुरु असताना तुमचे शिल्लक सेना प्रमुख आणि त्यांचे बगल बच्चे शांतच आहेत.अशा वेळी मनसेची भूमिका सडेतोड असते.म्हणून राज ठाकरे यांच्यावर टीका करून प्रसिद्धी मिळवण्याचा तुमचा हा प्रकार दिसून येत आहे.कुटुंबाला राजकारणात ओढायची तुमच्या गट प्रमुखांची सवय तशी जुनीच आहे.काही दिवसांपूर्वी तुमच्या गट प्रमुखांनी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला राजकारणात ओढले होते.मग तुमच्या सारखे चेले-चपाटे तरी कसे मागे राहतील? यातूनच तुमच्या पक्षांची संस्कृती दिसते.

आपल्याला ही एक मुलगी आहे.स्वार्थी राजकारणापोटी तिच्याबाबत कोणी अशी विधाने केली, तर ती तुमच्या मनात रूचतील का? अंधारे बाई, या पुढे याद राखा.संबंध नसताना जर राज साहेबांच्या नातवाला आपण जर राजकारणासाठी बोललात तर महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना तुमच्या कानाजवळ डि.जे. वाजवल्याशिवाय राहणार नाही.
ज्या बाबी पटत नसतील त्याला विरोध जरूर करा.मात्र, विरोधाची भाषा, स्तर महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभेल असा ठेवा, असे ट्विट शालिनी ठाकरे यांनी केले आहे.

 

 

Exit mobile version