पंतप्रधान मोदी नसते तर अयोध्येत राम मंदिर बांधले नसते!

प्रभू राम मंदिराचे सर्वाधिक श्रेय पंतप्रधान मोदींनाच, काँग्रेस नेता

पंतप्रधान मोदी नसते तर अयोध्येत राम मंदिर बांधले नसते!

अयोध्येत प्रभू रामलल्लाचा अभिषेक सोहळा पार पडत आहे.मोठ्या संख्येने भाविक अयोध्येत दाखल झाले आहेत.देशभरात दिवाळी साजरी करण्यात येत आहे.प्राणप्रतिष्ठा सोहळ्या दरम्यान, काँग्रेसच्या एका नेत्याने राम मंदिराच्या उभारणीचे श्रेय पंतप्रधान मोदी यांना दिले आहे.जर नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान नसते तर राम मंदिर बांधले नसते असेही ते म्हणाले आहेत.

प्रभू राम मंदिरासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करणारे नेते आचार्य प्रमोद कृष्णम आहेत.तसेच राम मंदिर अभिषेक सोहळ्याला उपस्थित न राहिल्याबद्दल काँग्रेस नेतृत्वावर टीकाही केली.कल्की पिठाधीश्वर आचार्य प्रमोद कृष्णम यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आणि त्यांच्यामुळेच हा शुभ दिवस आला असल्याचे सांगितले.

हे ही वाचा:

किती जण ‘एक राष्ट्र एक निवडणुकी’च्या बाजूने?

अयोध्येच्या पानविक्रेत्याचा व्यवसाय फळफळला!

खोदकामात मिळालेल्या ८४ खांबांनी दिला राममंदिराच्या अस्तित्वाचा पुरावा

मुंबईच्या अटल सेतूवर पहिला अपघात!

ते पुढे म्हणाले की, नायालयाच्या निर्णयानुसार मंदिर बांधण्यात आले आहे.सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर भगवान प्रभू रामांच्या मंदिराचे बांधकाम सुरु झाले.न्यायालयाच्या निर्णयानुसार मंदिर बांधले गेले हे खरे आहे, पण मोदी देशाचे पंतप्रधान नसते, आणि त्यांच्या जागी दुसरा कोणी पंतप्रधान असता तर हा निर्णय झाला असता, राम मंदिर बांधेल गेले नसते, असे कृष्णम म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, किती सरकारे आली, किती पंतप्रधान आले,विश्व हिंदू परिषद, आरएसएस, बजरंग दल,संत महात्म्यांनी मोठे बलिदान दिले.हा खूप मोठा संघर्ष आहे, परंतु मोदी देशाचे पंतप्रधान नसते तर राम मंदिर बांधलेच नसते, असे आचार्य प्रमोद कृष्णम म्हणत प्रभू राम मंदिराचे सर्व श्रेय पंतप्रधान मोदींना दिले आहे.

Exit mobile version