29 C
Mumbai
Tuesday, April 29, 2025
घरविशेष४८ तासांच्या आत वक्फ कायदा रद्द करू!

४८ तासांच्या आत वक्फ कायदा रद्द करू!

सपा खासदार अवधेश प्रसाद यांचे विधान 

Google News Follow

Related

वक्फ सुधारणा कायद्यावरून देशातील राजकारण तापले आहे. विरोधकांकडून या कायद्याला विरोध केला जात आहे. याच दरम्यान, उत्तर प्रदेशातील अयोध्या मतदारसंघातील समाजवादी पक्षाच्या खासदाराने या कायद्याबाबत मोठे विधान केले आहे. ‘जर आमचे सरकार आले तर ४८ तासांच्या आत वक्फ बोर्ड कायदा रद्द करू’, असे खासदार अवदेश प्रसाद म्हणाले आहेत.

यासोबतच, सपा खासदार म्हणाले, वक्फ सुधारणा कायदा देशातील मुस्लिमांसाठी धोकादायक आहे. हा कायदा संविधानाच्या विरुद्ध आहे. आमचे सरकार आल्यावर हा कायदा रद्द केला जाईल. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री बॅनर्जी यांच्या विधानाचेही अवधेश प्रसाद यांनी समर्थन केले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अलीकडेच म्हटले होते की त्यांचे सरकार पश्चिम बंगालमध्ये वक्फ सुधारणा कायदा लागू करू देणार नाही.

शनिवारी (१२ एप्रिल) मुर्शिदाबाद कायद्याविरुद्ध झालेल्या हिंसक निदर्शनांनंतर, मुख्यमंत्री ममता ट्वीटरवर पोस्टकरत लिहिले की, ‘आम्ही या प्रकरणावर आमची भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही या कायद्याचे समर्थन करत नाही. हा कायदा आपल्या राज्यात लागू होणार नाही. मग दंगल कशासाठी होत आहे? यासोबतच, मुख्यमंत्र्यांनी लोकांना शांतता राखण्याचे आणि धर्माच्या नावाखाली अशांतता पसरवू नये असे आवाहन केले आहे.

हे ही वाचा : 

पवन कल्याण यांच्या मुलाला भारतीय कामगारांनी वाचवले, सिंगापूर सरकारकडून सन्मान

८५० बैल आणि ३५० बुलफायटर्सचा पराक्रम बघा

शुक्रवारी जुम्मा नमाजानंतर मुर्शिदाबादमध्ये हिंदू लक्ष्य, हिंदूंचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर

एशियन योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिपसाठी सोनीपत येथे ट्रायल सुरू

दरम्यान, वक्फ कायद्यामुळे सुरू झालेल्या हिंसक निदर्शनांमुळे मुर्शिदाबादमध्ये तणाव आहे. हिंसक निदर्शनांनंतर, मुर्शिदाबादमधून रहिवासी बोटीने पळून जाताना आणि सुरक्षिततेच्या शोधात नदी ओलांडून शेजारच्या मालदामध्ये जाण्याचा प्रयत्न करतानाचे दृश्ये समोर आली आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आज (१३ एप्रिल) १२ जणांना अटक केली आहे. आकडेवारीनुसार, आतापर्यंत १५० लोकांना अटक केली आहे. परिसरात पोलीस, सुरक्षा दलांचे पथक गस्त घालत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
245,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा