23.6 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेषनरेंद्र मोदींनी बाईक बंद करायला सांगितली तरच करणार!

नरेंद्र मोदींनी बाईक बंद करायला सांगितली तरच करणार!

वरळी सीलिंकवर बाईक घेऊन जाणाऱ्या तरुणीचे अजब वक्तव्य, गुन्हा दाखल

Google News Follow

Related

वांद्रे-वरळी सी लिंकवर एका महिलेने दुचाकी वेगाने चालवल्या प्रकरणी सुरक्षारक्षक आणि पोलिसांकडून महिलेला अडवण्यात आले आहे.पोलिसांनी महिलेला अडवल्याने महिलेने पोलिसांना शिविगाळ करत धक्का-बुक्की केली.या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.वाहतूक अधिकाऱ्याला शिवीगाळ, धमकी आणि धक्काबुक्की केल्याप्रकरणी पोलिसांनी २६ वर्षीय महिला आर्किटेक्टविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईतील वांद्रे-वरळी सी-लिंकवर दुचाकी चालवणारी महिला मध्य प्रदेशातील जबलपूर येथील रहिवासी असून नुपूर मुकेश पटेल असे या महिलेचे नाव आहे.या महिलेने सी-लिंकवर दुचाकी वेगाने चालवत होती तेव्हा सुरक्षारक्षक आणि पोलिसांनी तिला अडवले असता पोलिसांना शिवीगाळ करत धमकी दिल्याची घटना आज सकाळी घडली.ट्रॅफिक अधिका-यांसोबत महिलेचा बाचाबाचीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.या व्हिडिओत महिला आणि हवालदारासोबत झालेला वाद दिसून येत आहे.पोलिसांनी महिलेला अडवल्यानंतर तिची दुचाकी बंद करण्यास सांगितले.परंतु महिलेने उद्धटपणे उत्तर देत म्हणाली, नरेंद्र मोदींनी मला फोन करून माझी बाईक बंद करायला सांगितली तर मी ते करेन. जा मोदींना फोन करा.”

अधिकाऱ्याने तिला ओढून घेण्याचा प्रयत्न केल्यावर ती त्याला शिवीगाळ करते आणि म्हणते, “हात काट के रख दूंगी… हिम्मत कैसे हुई तेरी गाडी छुने की (मी तुझा हात कापून टाकीन. माझ्या बाईकवर हात ठेवण्याची हिम्मत कशी झाली तुझी ). “पोलिसांनी सांगितले की, त्यांना वांद्रे-वरळी सी लिंक सुरक्षा कर्मचार्‍यांकडून फोन आला की नुपूर मुकेश पटेल नावाची एक महिला सी लिंकवर तिची बुलेट चालवत दक्षिण मुंबईच्या दिशेने जात आहे.

हे ही वाचा:

संजय राऊत, अंबादास दानवेंच्या बोलण्यावर बंदी घालावी

६४३ कोटी किलोमीटर अंतर पार करून लघुग्रहाचा तुकडा घेऊन नासाचे कॅप्सूल पृथ्वीवर

कैसमीच्या भारतीय संगीत प्रेमाची पंतप्रधानांनी घेतली दखल

चांद्रयान ३, जी-२० परिषदेने भारताला शिखरावर नेले!

“जेव्हा पोलीस कर्मचाऱ्यांनी तिला थांबवले तेव्हा तिने त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली आणि सांगितले की तिच्या वडिलांचा रस्ता आहे आणि ती करदाते आहे आणि त्यामुळे तिला कोणीही रोखू शकत नाही. अनेक विनंत्या करूनही, ती तिची दुचाकी रस्त्याच्या एका बाजूला नेण्यास तयार नव्हती आणि वाहतूक पोलिसांशी वाद घालत होती,” एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

“महिलेला अडवल्याने वाद घालत, एका हवालदाराला धक्काबुक्कीही केली,” अधिकारी म्हणाला, तिच्यावर अडथळा आणणे, निष्काळजीपणे वाहन चालवणे, धोक्यात आणणे आणि सार्वजनिक सेवकावर हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपी महिला नुपूर मुकेश पटेल ही मध्य प्रदेशातील जबलपूर येथील रहिवासी आहे. तिला फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) च्या कलम ४१A अंतर्गत तपास अधिकार्‍यासमोर हजर राहण्यासाठी नोटीस देण्यात आली आणि तिला जाण्याची परवानगी देण्यात आल्याचे, पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा