मराठी पाट्या लावल्या नाहीत तर सोमवारपासून कारवाई

दुकानावर मराठी नामफलक नसल्यास मुंबई महानगरपालिका करणार कारवाई

मराठी पाट्या लावल्या नाहीत तर सोमवारपासून कारवाई

मुंबईसह महाराष्ट्रात दुकानांच्या बाहेर नामफलक मराठीत लावण्याचे नियम महाराष्ट्र राज्य सरकारने घेतले आहेत. त्या अगोदर मुंबई महानगर पालिकेने चारवेळा मुदतवाढ देऊन सुद्धा काही दुकानदाराने अद्याप नाव बदलेले नाहीत. अशा टाळाटाळ करणाऱ्या दुकानदारांवर सोमवारपासून कारवाई करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे.

मुंबई महानगर पालिकेने ३० सप्टेंबर पर्यंत नामफलक बदलण्याची मुभा दुकानदारांना दिली होती. मात्र आता ही मुदतवाढ संपुष्टात आली असून, मुंबई महानगरपालिका सोमवार पासून कारवाईचा बडगा उचलण्यास सुरुवात करणार आहेत. त्यामध्ये कारवाई नंतर प्रथम दुकानदाराला सात दिवसाची नोटिस देण्यात येणार आहे व नंतर कायद्यानुसार कारवाई सुद्धा केली जाणार आहे.

हे ही वाचा:

भुजबळांप्रमाणे चतुर्वेदी सीए याने ‘मातोश्री’ची कागदपत्रे व्हाईट करून घेतली

सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन

मुंबईतल्या गोडाऊनमधून १०० कोटींचे एमडी जप्त

उत्तर प्रदेशमध्ये तरुणाने अमित बनून हिंदू मुलीवर केला बलात्कार

मुदतवाढ देऊन सुद्धा ४८ टक्के दुकानांची समोरील दर्शनी भागावरील नामफलक अजूनही मराठीत लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे उर्वरित दुकानदारावर महानगरपालिकेने कारवाई न केल्यामुळे पालिका आयुक्तांवर टीकेची झोड उठवण्यात आली होती. तसेच सोमवार पासून होणाऱ्या कारवाईमध्ये पहिल्या टप्प्यात २४ विभागांतील दुकानांची पाहणी करण्यात येणार आहे. त्यात मराठी ठळक अक्षरात नाव नसल्यास दुकानांना सात दिवसांची नोटिस दिली जाणार आहे. त्या नंतर ही बदल न केल्यास त्यांना कायदेशीर नोटिस देत, खटला भरून, दंड वसूल करण्यात येणार आहे, अशी माहिती उपायुक्त संजोग कबरे यांनी दिली.

Exit mobile version