शक्य असतं तर विशाल गवळीचा चौरंगच केला असता!

भाजपा महिला आमदार चित्रा वाघ यांचे वक्तव्य

कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार हत्या प्रकरणी राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. आरोपी विशाल गवळीला कल्याण कोर्टाने २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्यामध्ये आरोपीच्या पत्नीचाही समावेश असल्याने तिला देखील २ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी कल्याण कोर्टाने सुनावली आहे. दरम्यान, आरोपीला फाशीची शिक्षा, गोळ्या घालून ठार करण्याची मागणी अनेकांकडून केली जात आहे.

हे प्रकरण बदलापूर आरोपीशी जोडण्याचा प्रयत्न केला जात असून आरोपी विशाल देखील तशीच शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे. याच दरम्यान, भाजपा महिला आमदार चित्रा वाघ यांचे वक्तव्य समोर आले आहे. आरोपीला फाशीची शिक्षा झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नसल्याचे म्हटले आहे.

चित्रा वाघ यांनी ट्वीटकरत म्हटले, शक्य असतं तर विशाल गवळीचा चौरंग केल्याशिवाय गप्प बसलो नसतो मात्र संविधानिक पद्धतीने विशाल गवळीला कठोरात कठोर म्हणजेच फाशीची शिक्षा दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.

इथे देवाभाऊंची प्रत्येक बहिण आणि तिच्या लेकी सुरक्षित राहाव्या यासाठी आपले देवाभाऊ दिवस रात्र झटत आहे. त्यामुळे गवळीसारख्या नराधमांच्या नुसत्या मुसक्याच आवळल्या नाही जाणार तर त्यांना फासावर लटकवलं जाणार हे नक्की.

आज त्या चिमुकलीच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आम्ही सगळेचं खंबीरपणे उभे आहोत आणि आमचा सर्वांचा समस्त महाराष्ट्रातल्या बहिणींचा विश्वास आहे की विशाल गवळी सारख्या विकृतांना गाडल्याशिवाय आमचा देवा भाऊ शांत बसणार नाही, असे चित्रा वाघ यांनी म्हटले.

हे ही वाचा : 

वीर बाल दिनी १७ शूर मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार

पवित्रा पुनियाचा ट्रोलवर प्रहार

पाकिस्तानने पोसलेले १५ हजार तालिबान्यांची पाकिस्तानवरच कूच

काँग्रेसच्या कार्यक्रमात भारताच्या नकाशातून पीओके, अक्साई चीन गायब

 

Exit mobile version