‘मंत्री नसतो तर त्यांचे तुकडेतुकडे केले असते’

द्रमुक मंत्र्यांची पंतप्रधान मोदी यांना धमकी

‘मंत्री नसतो तर त्यांचे तुकडेतुकडे केले असते’

‘मी मंत्री आहे म्हणून शांत आहे आणि सौम्यपणे बोलत आहे. जर मी मंत्री नसतो, तर त्यांचे तुकडे तुकडेच केले असते,’ असे वादग्रस्त विधान तमिळनाडूतील सत्ताधारी द्रमुकचे मंत्री टीएम अंब्रासन यांनी जाहीरपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केले आहे. या विधानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

टीएम अंबरासन हे ग्रामीण उद्योग, लघु उद्योग आणि झोपडपट्टी पुनर्वसन मंत्री आहेत. हे वादग्रस्त विधान त्यांनी गेल्या आठवड्यात केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी तमिळनाडूमधील त्रिप्पूर येथे मोठा रोडशो घेतला होता. त्यानंतर हे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे.

हे ही वाचा:

पिटबुल, अन्य धोकादायक जातीच्या श्वानांवर बंदीची केंद्राची शिफारस!

अदानी उद्योगाच्या समभागांचे एका दिवसात एक लाख कोटीचे नुकसान!

“नागरिकत्व दुरुस्ती कायदा कधीही मागे घेतला जाणार नाही”

“अल्पसंख्याकांच्या मतांसाठी उद्धव ठाकरेंकडून ‘सीएए’वर राजकारण सुरू”

‘आपल्याला अनेक पंतप्रधान लाभले. मात्र अशा प्रकारे बोलणारे एकही नव्हते. मोदी यांनी आम्हाला नामशेष करण्याची धमकी दिली आहे. पण मला त्यांना सांगायचे आहे की, द्रमुक ही सर्वसाधारण संघटना नाही. अनेकांचे त्याग आणि रक्त सांडून ही संघटना उभी राहिली आहे. जो कोणी द्रमुकला नामशेष करू पाहतो आहे, त्याचा स्वतःचाच निःपात होईल. ही संघटना सदैव उभी राहील, हे लक्षात ठेवा. मी त्यांच्याशी (मोदी) वेगळ्या प्रकारे वागलो असतो. मी आता शांत आहे आणि सौम्यपणे बोलत आहे, कारण मी मंत्री आहे. जर मी मंत्री नसतो, तर मी त्यांना वेगळ्या प्रकारे वागलो असतो,’ असे अंबरासन या व्हिडीओत म्हणत आहेत.

भाजपची टीका
द्रमुकने पंतप्रधानांना अशा धमक्या दिल्याने भाजपने याचा तीव्र शब्दांत निषेध केला. तसेच, त्यांनी इंडिया आघाडीवरही टीका केली. ‘ इंडि आघाडीचा अजेंडा स्पष्टच दिसून येत आहे. त्यांना सनातन धर्म आणि त्याला पाठिंबा देणाऱ्यांना नामशेष करायचे आहे,’ असे भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालविया यंनी स्पष्ट केले. पंतप्रधानांविरोधात अशा प्रकारचे अवमानजनक वक्तव्य करून ते लोकसभा निवडणुकीत चांगल्या कामगिरीची अपेक्षा करत आहेत, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय सचिव सत्यकुमार यादव यांनी केली.

Exit mobile version