अमेरिकन गायिका मिलबेनने नीतिशकुमारना सुनावले!

मी भारतीय नागरिक असते तर बिहारच्या मुख्यमंत्री पदासाठी लढले असते, मेरी मिलबेन

अमेरिकन गायिका मिलबेनने नीतिशकुमारना सुनावले!

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या लोकसंख्या नियंत्रणावरील टिप्पणीवर यूएस गायिका व आफ्रिकन-अमेरिकन अभिनेत्री मेरी मिलबेन यांनी टीका केली आहे.बिहारच्या मुख्यमंत्री पदासाठी आता महिलांनी पुढे आले पाहिजे.मी जर भारतीय नागरिक असती तर मुख्यमंत्री पदासाठी लढली असती असे वक्तव्य मेरी मिलबेन यांनी केलं आहे.तसेच नितीश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या लोकसंख्या नियंत्रणाच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर तीव्र टीका होत असताना, अमेरिकन गायिका आणि आफ्रिकन-अमेरिकन अभिनेत्री मेरी मिलबेन यांनी सुद्धा त्यांच्यावर टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.आता एका ‘धैर्यवान महिलेने’ पुढे येऊन बिहारच्या प्रमुखपदासाठी उमेदवारी जाहीर करण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या.

बिहारमध्ये महिलांच्या मूल्याला आव्हान दिले जात आहे.याला एकच उत्तर आहे, ते म्हणजे आता एका ‘धैर्यवान महिलेने’ पुढाकार घेऊन मुख्यमंत्री पदासाठी उमेदवारी जाहीर करावी.जर मी भारताची नागरिक असते, तर मी बिहारला जाऊन मुख्यमंत्रिपदासाठी निवडणूक लढवली असती,”असे त्यांनी एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

हे ही वाचा:

आयपीएस अधिकाऱ्यासह तीन पोलिसांवर विभागीय कारवाईचे निर्देश

मेट्रोची कामे थांबवा, महापालिकेचे आदेश!

जम्मू काश्मीरमध्ये चकमकीत दहशतवादी ठार

इसिस मॉड्यूल प्रकरणातील दहशतवादी उच्चशिक्षित; केमिकल्ससाठी होते खास कोडवर्ड
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक
व्हिडिओमध्ये मिलबेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना म्हटले की, ते महिला सक्षमीकरणावर विश्वास ठेवणारे नेते आहेत. भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंध आणि जगाच्या जागतिक आर्थिक स्थैर्यासाठी पंतप्रधान मोदी हे सर्वोत्कृष्ट नेते असल्याचे त्या म्हणाल्या, मला भारतावर प्रेम आहे.

मिलबेन यांचे वक्तव्य प्रियांका चतुर्वेदींना झोंबले
नितीश कुमारांच्या टिप्पणीवर अमेरिकी गायिका मेरी मिलबेन यांनी टीका केली.मिलबेन यांचे हे वक्तव्य उद्धव ठाकरे गटाच्या प्रियांका चतुर्वेदी यांना चांगलेच झोंबले. त्यावर त्यांनी मिलबेन यांना उत्तर दिले. प्रियांका चतुर्वेदी ट्विट करत म्हणाल्या, मेरी मिलबेनचे मणिपूरबद्दल मत आहे. बिहारच्या मुख्यमंत्र्यांबद्दल मेरी मिलबेन यांचे मत आहे.२०२४ मध्ये कोणाला मत द्यायचे यावर मेरी मिलबेन यांचे मत आहे.तर मेरी मिलबेनने तिचे यूएस नागरिकत्व सोडून भारतात जावे आणि भारताचे नागरिकत्व घ्यावे जेणेकरून मोदी सरकारची खरी जादू अनुभवता येईल.तोपर्यंत मॅडम कृपया बसा.

दरम्यान, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलेले वक्तव्य मागे घेत माफी मागितली आहे.तसेच माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्याचे नितीश कुमार यांनी म्हटले आहे.

 

Exit mobile version