‘बेकायदा मशिदींविरोधात हिंदूंनी आवाज उठवला तर गृहयुद्ध होईल’

काँग्रेसचे जेष्ठ नेते राशिद अल्वी यांचा इशारा

‘बेकायदा मशिदींविरोधात हिंदूंनी आवाज उठवला तर गृहयुद्ध होईल’

उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशसह इतर राज्यांमध्ये बेकायदेशीर मशिदींविरोधात हिंदू संघटनांकडून निदर्शने वाढत आहेत. देशभरातील हिंदू संघटनांकडून कारवाई करण्याची मागणी होत आहे. याच दरम्यान, एका काँग्रेसच्या जेष्ठ नेत्याने इशारा दिला आहे. देश या दिशेने जाऊ शकत नाही, जर परिस्थिती सुधारली नाही तर भारत गृहयुद्धात  (सिविल वॉर) अडकू शकतो, असा इशारा काँग्रेस नेते राशिद अल्वी यांनी दिला.

दिल्लीत पत्रकारांशी बोलताना काँग्रेस नेते राशिद अल्वी म्हणाले, या वाढत्या निषेधामुळे चिंता होत आहे, जे विशेषतः भारतीय जनता पक्ष (भाजपा) शासित राज्यांमध्ये दिसून येत आहे. भाजप सरकारच्या काळात मशिदींबद्दल वाढता द्वेष पाहून मी दु:खी आणि काळजीत आहे. मशिदी पाडण्याची मागणी सर्वत्र होत आहे. एकीकडे मुस्लिम देशांमध्ये मंदिरे बांधली जात असताना दुसरीकडे भारतात मशिदींना लक्ष्य केले जात आहे. ही परिस्थिती फार काळ टिकू शकत नाही, याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. अशा घटना देशाला गृहयुद्धाकडे घेऊन जात आहेत, असे राशिद अल्वी म्हणाले.

हे ही वाचा : 

आदित्य ठाकरेंची गडगंज संपत्ती, भातखळकर म्हणाले, वाझे प्रसन्न…

जय गाझा- जय पॅलेस्टाईनवाल्या आव्हाडांवर वेदमंत्रांचा शिडकावा कशासाठी?

रतन टाटांनी घेतला निरोप, मात्र, निघताना नोकर आणि श्वानाचीही केली सोय!

मुख्यमंत्री शिंदेनी पत्ता टाकला, आदित्य ठाकरेंविरुद्ध मिलिंद देवरा वरळीच्या मैदानात!

ते पुढे म्हणाले, आज तुमच्याकडे सत्ता-ताकद आहे, पण सरकार कायम टिकत नाही. त्यामुळे मशिदी आणि मंदिर या दोन्हींची सुरक्षा आवश्यक आहे. सर्व धार्मिक स्थळांचे संरक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. दरम्यान, हिंदू संघटना बेकायदा बांधकामांविरोधात आंदोलन करत असून सरकारकडे कारवाईची मागणी करत आहेत, याचदरम्यान काँग्रेस नेते राशिद अल्वी यांचे हे वक्तव्य आले आहे.

Exit mobile version