मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बांगलादेशातील परिस्थितीवर मोठे विधान केले आहे. आपल्याला एकजूट होण्याची गरज आहे, ‘जर विभागले गेलात तर कापले जाल’, असे मुख्यमंत्री योगी म्हणाले आहेत. आज जन्माष्टमी असून बांगलादेशातील हिंदू भीतीच्या छायेत आपल्या देवाची पूजा करत असल्याचे ते म्हणाले. आग्रा शहरात उभारण्यात आलेल्या ‘वीर दुर्गादास राठोड’ यांच्या पुतळ्याचे आज (सोमवार, २६ ऑगस्ट) अनावरण केल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सभेला संबोधित करताना जनतेला एकजूट राहण्याचे आवाहन केले.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, ‘राष्ट्र सर्वोच्च आहे, राष्ट्रापेक्षा मोठे काहीही असू शकत नाही. पण हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा आपण सगळे एकत्र राहू. जर विभागले गेलात तर कापले जाल’. बांगलादेशात काय चालले आहे तुम्ही पाहात आहात ना, तश्या चुका इथे झाल्या नाही पाहिजेत, ‘एकजूट राहिलात तर सुरक्षित राहू’, असे मुख्यमंत्री योगी म्हणाले. ते पुढे म्हणाले, आपल्याला विकसित भारतासाठी कार्य करायचे आहे, मी पुन्हा एकदा राष्ट्रवीर दुर्गादास राठोड त्यांना नमन करतो.
हे ही वाचा :
‘महिला सुरक्षेबद्दल बोलणारे उद्धव माझ्यासाठी काय करणार?’
‘बंगालचे लोक ममतांना सत्तेतून हटवून त्यांचे गंगेत विसर्जन करतील’
भाजपाकडून जम्मू- काश्मीरसाठी १५ उमेदवारांची यादी जाहीर
लडाखच्या समृद्धीसाठी केंद्राचा महत्त्वाचा निर्णय; पाच नव्या जिल्ह्यांची निर्मिती
दरम्यान, उत्तर प्रदेशसह देशभरात आज श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी होत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कृष्ण जन्मोत्सवानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. कृष्ण जन्माष्टमी उत्सवात सहभागी होण्यासाठी ते आग्रा ते मथुरेला जाणार आहेत. येथे कृष्ण जन्मभूमीला भेट देणार आहे.