‘शहाजहान शेखला आमच्याकडे द्या १० मिनिटात हिशोब करू’

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचं टीकास्त्र

‘शहाजहान शेखला आमच्याकडे द्या १० मिनिटात हिशोब करू’

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी मंगळवारी (२१मे) पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील मथुरापूर येथे जाहीर सभेला संबोधित केले.सभेला संबोधित करताना सीएम हिमंता म्हणाले की, मी बंगालमध्ये आल्यावर पहिल्यांदा संदेशखळी येथे गेलो होतो.तेव्हा तेथील माता-भगिनींनी मला जे सांगितलं ते ऐकून मला दुःख झालं होत.”तिथे माता-भगिनींवर अत्याचार होत आहेत, हे सर्व शाहजहान शेख सारख्या गुंडांनी केले आहे, पण ममता दीदींनी कोणतीही कारवाई केली नाही.शाहजहान शेखसारखे गुंड आसाममध्ये असते तर मी १० मिनिटांत त्याचा हिशोब केला असता, असे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले.

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा पुढे म्हणाले, संदेशखळीमध्ये आई, बहीण यांच्यावर अत्याचार होत आहे.जबरदस्ती घराचा ताबा मिळवला जात आहे.हे सर्व शाहजहान शेख सारखा गुंड करत आहे.परंतु या गुंडांवर ममता दीदींनी कोणतीही कारवाई केली नाही.

हे ही वाचा:

भाजप ३०० जागा पार करेल, पंतप्रधान मोदींविरोधात नाराजी नाही!

संथगती मागचे सत्य, बिघाडा मागचा बोभाटा…

पुणे हिट अँड रन प्रकरणी बाल न्याय मंडळाने दिलेला निर्णय धक्कादायक

‘ठाकरे कुटुंबीय ४ जूननंतर लंडनला पळण्याच्या तयारीत’

ते म्हणाले की, मी कालच कोलकातामध्ये म्हणालो जर शाहजहान शेख सारखे गुंड आसाममध्ये असते तर त्यांचा १० मिनिटात हिशोब चुकता केला असता.मला दीदींना (ममता बॅनर्जी) सांगायचे आहे की, जर त्या शाहजहानवर कारवाई करू शकत नसतील तर त्याला माझ्या स्वाधीन करा, मी त्याला आसामला घेऊन जाईन आणि त्याचा हिशोब बरोबर चुकता करिन, असे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले.

 

Exit mobile version