दोन डोसमधील अंतर कमी असल्यास ‘डेल्टा’ व्हेरिएंटविरोधात अधिक प्रभावी

दोन डोसमधील अंतर कमी असल्यास ‘डेल्टा’ व्हेरिएंटविरोधात अधिक प्रभावी

ज्या लोकांनी आतापर्यंत कोरनाचा एकच डोस घेतला आहे त्या लोकांमध्ये डेल्टा व्हेरिएंटविरोधात कमी अँटीबॉडी तयार झाल्या आहेत. त्यामुळे कोरना लसीच्या दोन डोसमधील अंतर जास्त असेल तर त्यामुळे शरीरात कमी अँटीबॉडी तयार होत आहेत. यावर उपाय म्हणजे दोन डोसमधील अंतर कमी करणे. हे अंतर कमी असल्यास कोरोनाची लस ही डेल्टा व्हेरिएंटविरोधात अधिक प्रभावी ठरेल असा दावा सायन्स नियतकालिक द लॅन्सेट ने केला आहे.

अमेरिकन लस फायझर ही कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटविरोधात कमी प्रभावी असल्याचं द लॅन्सेटने आपल्या अभ्यासात सांगितलंय. फायझरचा एक डोस हा कोरोना विरोधात ७९ टक्के प्रभावी आहे, पण डेल्टा व्हेरिएंटविरोधात केवळ ३२ टक्के प्रभावी असल्याचं समोर आलं आहे.

या अभ्यासात असंही सांगण्यात आलं आहे की, लोकांना लवकरात लवकर कोरोनाची लस द्यावी. ज्यांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे त्यांना दुसरा डोस हा कमी अंतराने द्यावा. त्यामुळे या डेल्टा व्हेरिएंटविरोधात प्रतिकार शक्ती विकसित होऊ शकेल.

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार केला आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत रुग्णांची संख्या ही मोठी होती. तसेच मृतांची संख्याही अधिक होती. भारतातील कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेला डेल्टा व्हेरिएंट जबाबदार असल्याचं सांगण्यात येतंय.

जागतिक आरोग्य संघटनेने भारतात सापडलेल्या कोरोना व्हायरसचं नामकरण केलं आहे. भारतात सापडलेला बी.१.६१७.१ हा कोरोना व्हेरिएंट ‘कप्पा’ आणि बी.१.६१७.२ हा व्हेरिएंट आता ‘डेल्टा’ या नावाने ओळखला जाणार आहे. हे दोन व्हेरिएंट सर्वप्रथम भारतात सापडले होते. त्यानंतर सध्या ४४ हून जास्त देशांत त्यांचा प्रसार झाला आहे.

यामध्ये डेल्टा हे व्हेरिएंट कप्पाच्या तुलनेत आणि जगातील इतर व्हेरिएंटच्या तुलनेत ५० टक्के जास्त वेगाने पसरत असल्याचं समोर आलं आहे. भारतातील दुसऱ्या लाटेला प्रामुख्याने डेल्टा हा व्हेरिएंट जबाबदार आहे. त्यामुळे मृतांची सख्या मोठ्या प्रमाणात वाढली. देशातील जवळपास प्रत्येक राज्यात हा व्हेरिएंट सापडला असून दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि तेलंगनामध्ये याचे प्रमाण जास्त आहे.

हे ही वाचा:

फेसबुकने ट्रम्पवर घातली २ वर्षांची बंदी

इथेनॉल २१ व्या शतकातील भारताची प्राथमिकता

ठाकरे सरकार कधीही कोसळेल ते कळणारही नाही

जगभरात झालेल्या विनाश आणि मृत्यूमुळे चीनने १० ट्रिलियन डॉलर्स भरपाई द्यावी

जागतिक आरोग्य संघटनेनं भारतात सापडलेला कोरोना डेल्टा व्हेरिएंट हा सर्वाधिक धोकादायक असून तो एक चिंतेचा विषय असल्याचं सांगितलं आहे.

Exit mobile version