‘बटेंगे तो कटेंगे’ याचं गांभीर्य समजलं, सनातनींनी योग्य निर्णय घेतला!

हरियाणा निवडणुकीच्या निकालावर सुवेंदू अधिकारी यांचे वक्तव्य

‘बटेंगे तो कटेंगे’ याचं गांभीर्य समजलं, सनातनींनी योग्य निर्णय घेतला!

हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने इतिहास रचत सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापनेच्या दिशेने पावले टाकली आहेत. या निवडणुकीच्या निकालावर पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेन्दू अधिकारी यांनी आनंद व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना हरियानातील सनातनीयांचे कौतुक केले आणि म्हणाले, ‘बटेंगे तो कटेंगे’ (विभागले जाऊ तर कापले जाऊ) अशा नारेबाजीचे लोकांनी गांभीर्य ओळखून योग्य निर्णय घेतला.

मंगळवारी (८ ऑक्टोबर) दुपारी निवडणुकीचे निकाल स्पष्ट होताच सोशल मिडीयावर पोस्ट करत सुवेन्दू अधिकारी म्हणाले, हरयाणातील सनातनींनी ‘बटेंगे ते कटेंगे’ या घोषणांचे गांभीर्य समजून घेतले आणि त्यांनी योग्य निर्णय घेतला. भाजपला तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचा जनादेश देऊन हरियाणातील जनतेने आपण सनातन संस्कृती आणि एकात्मतेशी एकनिष्ठ असल्याचे दाखवून दिले आहे. मी हरियाणातील सर्व मतदारांना शुभेच्छा देतो, असे सुवेन्दू अधिकारी यांनी म्हटले.

हे ही वाचा : 

वडील, काकांना दहशतवाद्यांनी मारले, पण शगुनने विजय मिळवून दिला रोखठोक संदेश!

मुंबईकरांचे घराचे स्वप्न म्हाडाच्या माध्यमातून साकार

जम्मू- काश्मीरसह देशातील जनतेला कळून चुकलंय, देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीचं पर्याय

ऑल्ट न्यूजचे मोहम्मद झुबेरविरोधात तक्रार दाखल

दरम्यान, आताच्या आकेदेवारीनुसार, हरियाणा विधानसभेतील ९० जागांपैकी भाजप ५० जागांवर आघाडीवर आहे, ज्याने सरकार स्थापनेसाठी आवश्यक ४६ जागांचा टप्पा ओलांडला आहे. दुसरीकडे काँग्रेस ३५ जागांवर आघाडीवर आहे. पाच जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहे. हरियाणाच्या इतिहासात एका पक्षाचे सलग तीनवेळा सत्तेत येण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Exit mobile version