पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशातील सर्वात शक्तिशाली भारतीय बनले आहेत.इंडियन एक्सप्रेसच्या ‘मोस्ट पॉवरफुल इंडियन २०२४’ ची यादी जाहीर करण्यात आली.पंतप्रधान नरेंद्र मोदी या यादीत प्रथम क्रमांकावर आहेत तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत.या यादीतील शीर्ष १० पैकी बहुतांश लोक हे भारतीय जनता पक्षाचे आणि आरएसएस संघाचे लोक आहेत.
इंडियन एक्सप्रेसच्या २०२४च्या ‘आयई:१०० लिस्ट’ मध्ये अब्जाधीश गौतम अदानी आणि भारताचे मुख्य न्यायाधीश डी.वाय चंद्रचूड यांचाही टॉप १० शक्तिशाली भारतीयांमध्ये समावेश करण्यात आला आहे.तर दुसरीकडे काँग्रेस नेता राहुल गांधी २०२४ च्या सर्वात ताकदवर भारतीयांच्या लिस्टमध्ये १६ व्या स्थानावर आहेत.तसेच आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे १८ व्या स्थानावर आहेत.
टॉप १० लिस्ट
पंतप्रधान नरेंद्र मोदी
इंडियन एक्स्प्रेसच्या २०२४ च्या टॉप १०० प्रभावशाली भारतीयांच्या यादीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या स्थानावर आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विटरवर ९.५६ कोटी फॉलोवर्स आहेत.जगातील सर्व नेत्यांपैकी नरेंद्र मोदी यांच्या फॉलोवर्सची संख्या अधिक आहे.
अमित शहा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सर्वात शक्तिशाली भारतीय ठरले आहेत.अमित शहा हे भाजपचे मुख्य रणनीतीकार म्हणून ओळखले जातात.अमित शहांच्या नेतृत्वाखाली पक्षाने डिसेंबर २०२३ मध्ये मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत प्रचंड विजय मिळवला.
मोहन भागवत
या यादीमध्ये आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत तिसऱ्या क्रमांकावर आहेत.२२ जानेवारीच्या राम मंदिर सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत मोहन भागवत पूजेला बसले होते.
डी.वाय चंद्रचूड
सरन्यायाधीश डी.वाय चंद्रचूड हे चौथे सर्वात शक्तिशाली भारतीय आहेत.सरन्यायाधीश डी.वाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने कलम-३७० रद्द करण्याच्या केंद्र्याच्या निर्णयाला हिरवा कंदील दिला होता.डी.वाय चंद्रचूड यांचा सरन्यायाधीश पदाचा कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये संपणार आहे.
हे ही वाचा:
न्यायाधीशाला योग्य प्रकारे सॅल्युट न करणे भोवले
हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसची कसोटी!
दोनपेक्षा अधिक अपत्ये असलेल्यांना सरकारी नोकरी नाहीच
हिंसाचार करणाऱ्या शेतकऱ्यांचे पासपोर्ट, व्हिसा रद्द करणार
एस जयशंकर
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आपल्या मजबूत राजनैतिक कौशल्याने देशातील नागरिकांना प्रभावित केले आहे.
योगी आदित्यनाथ
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे भाजपच्या सर्वात प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत.मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भूमिका नेहमी चर्चेत असते.राज्यात हिंदू मतदारांना एक कारण्याचे काम मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ करत आहेत.
राजनाथ सिंह
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील सर्वात जेष्ठ सहकारी आहेत.
निर्मला सीतारामन
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या भारतातील सर्वाधिक काम करणाऱ्या महिला अर्थमंत्री आहेत.त्यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या अर्थव्यवस्थेने सलग तीन वर्षे ७ टक्के वाढ नोंदवली.
जे.पी.नड्डा
जे.पी.नड्डा हे भाजप संघटनेचे नेतृत्व करणारे प्रमुख व्यक्ती आहेत.त्यांचा कार्यकाळ गेल्यावर्षी वाढवण्यात आला.
गौतम अदानी
१०१ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह गौतम अदानी हे या यादीमध्ये १० क्रमांकावर आहेत.तसेच गौतम अदानी यांचे जवळचे प्रतिस्पर्धी अब्जाधीश मुकेश अंबानी हे ११ व्या क्रमांकावर आहेत.