बांगलादेशात ज्याप्रमाणे हिंदुंवर अत्याचार होताना दिसत आहे. त्याच प्रमाणे भारताच्या पश्चिम बंगालमध्येही हिंदुंवर अत्याचार होत असल्याचे समोर येत आहे. मागील काही दिवसांपासून दररोज तशा घटना समोर येत आहे. हिंदू देवतांच्या मूर्तींची तोडफोड केल्याचे नुकतेच समोर आले होते. याच दरम्यान, आता आणखी एक घटना समोर आली आहे. काही कट्टरवाद्यांकडून हिंदू देवतांच्या मूर्तीची तोडफोड केल्याचे समोर आले आहे. भाजपाचे नेते अमित मालवीय यांनी व्हिडीओ शेअर करत याची माहिती दिली. तसेच भाजपा बंगालच्या हिंदूंच्या पाठीशी असून आम्ही ममता बॅनर्जींना पश्चिम बंगालला दुसरे बांगलादेश बनवू देणार नसल्याचे अमित मालवीय यांनी म्हटले आहे.
अमित मालवीय यांनी ट्वीटकरत म्हटले, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालमधील हिंदूंना सतत हल्ले सहन करावे लागत आहेत. नंदीग्राम ब्लॉक २ च्या अमदाबाद भागातील कमालपूर येथे, स्थानिक रहिवासी गेल्या मंगळवारपासून पूजा करत होते. तथापि, पूजा आणि रामनारायण कीर्तन अखंडपणे सुरू असताना, काही व्यक्तींना – श्री रामाच्या नावाचा जप सहन झाला नाही, त्यांनी त्या जागेची तोडफोड केली आणि मूर्तींची विटंबना केली.
हे ही वाचा :
ड्रोन्स, गगनयान प्रोजेक्टची गुप्त माहिती देणाऱ्या दोघांना अटक
पाकिस्तानमधील स्थानिक नेत्याला लक्ष्य करून मशिदीत स्फोट; चार जखमी
‘पश्चिम बंगाल बनत आहे मिनी काश्मीर’
बंगाल भर्ती घोटाळा प्रकरणात पार्थ चॅटर्जींचे जावई बनले माफीचे साक्षीदार
बरुईपूर, जाधवपूर आणि मुर्शिदाबादसह राज्यभर अशाच घटना घडल्या आहेत. याव्यतिरिक्त, ममता बॅनर्जी यांच्या पोलिसांनी बंगालच्या काही भागात होळी (डोल पौर्णिमा) साजरे करण्यावर निर्बंध लादण्याचा प्रयत्न केला, परंतु नंतर ते मागे हटवले गेले.
अशा घटनांमुळे सनातनींमध्ये व्यापक संताप आहे, परंतु या कठीण काळात भाजप बंगाल त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आम्ही ममता बॅनर्जींना पश्चिम बंगालला दुसरे बांगलादेश बनवू देणार नाही, असे अमित मालवीय यांनी म्हटले. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांच्या कारवाईची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
News coming in from #PurbaMedinipur district of #WestBengal.
Hindu temple is under attack!
On the night of 13/03/2024, unknown miscreants attacked a Hanuman temple in #Kamalpur village under the jurisdiction of #Nandigram Police Station of Purba Medinipur district.
The Murti… pic.twitter.com/YgsJArbEqY
— Hindu Voice (@HinduVoice_in) March 14, 2025