२० मिनिटांसाठी बनवला बॉम्बची धमकी दिलेल्या ईमेलचा आयडी!

धमकी देऊन केला डिलिट

२० मिनिटांसाठी बनवला बॉम्बची धमकी दिलेल्या ईमेलचा आयडी!

दिल्ली-एनसीआरच्या सुमारे २२३ शाळांमध्ये बॉम्बच्या धमकीचा ईमेल आयडी अवघ्या २० ते ३० मिनिटांसाठी बनवला गेला होता. शाळांमध्ये बॉम्ब असल्याच्या धमकीचे ईमेल पाठवल्यानंतर हा आयडी डिलिट करण्यात आला. दिल्ली पोलिसांचे स्पेशल सेल व गुन्हे शाखेच्या तपासात ही बाब उघड झाली आहे. हा ईमेल आयडी भारतातच बनवला गेला असावा, असे प्राथमिक तपासात आढळून आले आहे.

शाळांमध्ये धमकी देणारे मेल Savari.im@mail.com या ईमेलवरून पाठवण्यात आले, हा मेल १ मे रोजी बनवण्यात आला होता. हा मेल सुमारे २० ते ३० मिनिटे ठेवण्यात आला होता. त्यानंतर त्याला डिलिट करण्यात आले. आरोपींनी काही ठिकाणी व्हीपीएन नंबरचा वापर करून मूळ आयडी लपवला होता. त्यानंतर मॉस्कोच्या मेल.आरयू सर्व्हरला हिट केले. त्यामुळे आयपी ऍड्रेस कळू शकला नाही. मॉस्कोच्या मेल.सीयूवरून सर्व्हरला हिट करणाऱ्या आयडीचा आयपी ऍड्रेस कळतो, असे पोलिसांनी सांगितले.

हे ही वाचा:

‘तुम्हाला आधी रायबरेलीतून विजय मिळवावा लागेल’

‘श्री समर्थ’ च्या सुवर्णमहोत्सवी क्रीडा प्रशिक्षण शिबीराला दमदार प्रतिसाद

कोलकात्याने पराभूत केल्याने मुंबई प्लेऑफमधून बाहेर पडण्याची भीती

कॅनडा पोलिसांकडून तीन भारतीयांना अटक

या मेल आयडीला केवळ शाळेत बॉम्बच्या धमक्या देण्यासाठीच बनवण्यात आले होते. सर्व शाळांना मेल पाठवल्यानंतर लगेचच हा मेल आयडी डिलिट केला गेला.

Exit mobile version