संपूर्ण देशात कोविड वेगाने पसरत आहे. त्यामुळे काही राज्ये अंशतः तर काही राज्यात संपूर्ण टाळेबंदी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शालेय परिक्षा मात्र पुढे ढकलण्यात अथवा रद्द करण्यात आल्या आहेत. आयसीएसईने देखील १०वीच्या परिक्षा कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेऊन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र १२ वीच्या परिक्षा या पूर्वीच्या (१६ एप्रिल २०२१) पत्रकानुसारच घेतल्या जाणार आहेत.
ठाकरे सरकारने स्टेट बोर्डाच्या दहावी बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या होत्या तर सीबीएसईने देखील १०वीच्या परिक्षा रद्द करून १२वीच्या परिक्षा पुढे ढकलल्या होत्या.
हे ही वाचा:
आज लस उत्पादकांसोबत मोदींचा संवाद
आणखी कडक निर्बंध लादण्याची गरज
भारतीय सैन्य आता कोविड विरुद्धच्या लढाईतही
आज लस उत्पादकांसोबत मोदींचा संवाद
या दोन शिक्षण महामंडळांसोबत आयसीएसईचा निर्णय येणे बाकी होते. आज आयसीएसईने परिक्षांबाबतचा निर्णय घेतला आहे. आयसीएसईने देखील १०वीच्या परिक्षा कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेऊन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र १२ वीच्या परिक्षा या पूर्वीच्या पत्रकानुसारच घेतल्या जाणार आहेत. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
आयसीएसईने प्रसिद्ध केलेल्या एका पत्रकात ही माहिती दिली आहे. त्याबरोबरच या पत्रकाच्या शेवटी दहावीचा निकाल कशा प्रकारे लावला जाईल? त्याचे निकष काय असतील? व निकाल केव्हा मिळेल याबाबत नंतर माहिती देण्यात येईल असे देखील सांगण्यात आले आहे.
देशात वाढत्या कोरोनामुळे अजूनही शाळा उघडणे शक्य झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घ्यावे लागत आहे. महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता कहर पाहता, ठाकरे सरकारने या परिक्षा पुढे ढकलल्या आहेत.