संपूर्ण जगात कोविड महामारीने थैमान घातले आहे. यावर सध्या तरी लसीकरण हा उपाय आहे. भारतात कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसींच्या सहाय्याने लसीकरण चालू आहे.
आता या दोन्ही लसींचा डोस देण्याबाबत संशोधन चालू आहे.कोरोना विषाणूमध्ये सातत्यानं होणारा बदल जगभरातील शास्त्रज्ञांसाठी चिंतेचा विषय ठरत आहेत. कोरोना विषाणूचे नवीन व्हेरिअंट शरीरात तयार झालेल्या प्रतिकारशक्तीला सहजपणे चकवू शकतात, असंही अनेक संशोधनात म्हटलं आहे. त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय करता येईल, या अनुषंगाने शास्त्रज्ञ विविध उपायांचा पाठपुरावा करत आहेत.
हे ही वाचा:
दिल्लीतील हज हाऊसला स्थानिकांचा विरोध
८ वाजता मुख्यमंत्र्यांचा लाईव्ह संवाद! काय नवीन जबाबदारी टाकणार?
धक्कादायक! गर्भपिशव्या काढण्याचा इथे सुरू आहे धंदा
या दिशेनं संशोधन केल्यानंतर अनेक देशांनी आपल्या नागरिकांना मिक्स-अँड-मॅच लस द्यायला सुरुवात केली आहे. दोन वेगवेगळ्या पद्धतीनं तयार करण्यात आलेल्या लशीचे दोन डोस घेतल्यानंतर शरीरात रोगप्रतिकार शक्ती आणखी मजबूत होत असल्याचा दावा विदेशात झालेल्या संशोधनात करण्यात आला आहे.
भारतानंही याच दिशेनं एक पाऊल उचललं असून मिक्स-अँड-मॅच लसीकरणाच्या परिणाम जाणून घेण्यासाठी एक संशोधन केलं आहे. याबाबतची माहिती इंडियन काऊंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं दिली आहे. आयसीएमआरनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, भारतात तयार करण्यात आलेल्या कोविशिल्ड आणि कोव्हॅसीनचा मिश्रित डोस घेतल्यानंतर शरीरात सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. कोविशिल्ड आणि कोव्हॅसीन या दोन लशीचे वेगवेगळे डोस घेतल्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती आणखी मजबूत केली जाऊ शकते, असा दावा संबंधित निवेदनात करण्यात आला आहे.
आयसीएमआरने सांगितलं की, संशोधकांनी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही स्वदेशी लशी एकत्रित करत त्यावर अभ्यास केला आहे. अशा पद्धतीची मिक्स-अँड-मॅच लस केवळ सुरक्षितच नाही, तर रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी प्रभावी ठरू शकते, असं निवेदनात म्हटलं आहे. असं असलं तरी सध्या भारताच्या लसीकरण प्रोटोकॉलनुसार, ज्या कंपनीच्या लशीचा पहिला डोस घेण्यात आला आहे, त्याच कंपनीचा दुसरा डोस घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.