31 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरविशेषउत्तराखंड येथील पूरामागचे कारण उघड

उत्तराखंड येथील पूरामागचे कारण उघड

Google News Follow

Related

इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माऊंटन डेव्हलपमेंट (आयसीआयएमओडी) या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी उत्तराखंडच्या चमोली येथील पूराच्या घटनेची एक महिन्यानंतर उकल करण्याचा प्रयत्न केला आहे. या संस्थेच्या मते, या दुर्घटनेचे कारण रोंती शिखरावरून मोठ्या प्रमाणात कोसळलेली दगड हे असावे.

हे ही वाचा:

“भाजपाच्या डीएनए मध्ये बंगालचे सूत्र” – नरेंद्र मोदी

या संस्थेच्या अहवालानुसार, मोठ्या प्रमाणात कोसळलेल्या खडकांच्या उर्जेने बर्फ वितळला आणि हा पूर आला असावा. सुमारे २२ मिलीयन घनफूट खडक, बर्फ इत्यादी सर्व राडारोडा यापूर्वी दरीच्या तळाशी साचला होता. त्यामुळे या घटनेने पाण्याच्या प्रवाहात एकदम वाढ होऊन पूर परिस्थिती निर्माण झाली. सुमारे ५५० मीटर रुंदीचे दगड, धोंडे समुद्रसपाटीपासून ५,५०० मीटर उंचीवर कोसळला.

आयसीआयएमओडी संस्थेच्या अहवालानुसार हिमनदी फुटल्याने अथवा वितळल्याने हा पूर आला नाही. संस्थेच्या अभ्यासानुसार या भागात अशा प्रकारचे तळेच नसल्याने, हिमनदी फुटून पूर येऊ शकत नाही.

४-६ फेब्रुवारीच्य दरम्यान जम्मू- काश्मिर आणि वायव्य भारताच्या भागात वातावरणात अस्थिरता निर्माण झाली होती. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने भूस्खलन झाले असे या संस्थेचे मत आहे. यामुळेच नदीच्या खालच्या भागात पूराची संहारकता वाढली.

आयसीआयएमओडीच्या संशोधनानुसार या पूराच्या मार्गातील जलविद्युत प्रकल्पांमुळे या पूरांनी झालेले नुकसान वाढले. संस्थेच्या मते, या पुराचा थेट संबंध पर्यावरणीय बदलांशी नाही. परंतु तरीही, बर्फाच्या सातत्याने गोठण्या-वितळण्याच्या क्रियेचा तसेच कायमस्वरूपी गोठलेल्या स्तराचा देखील या पूरावर परिणाम झाला आहेच.

या अहवालात, डोंगराळ भागातील बांधकाम करताना पर्यावरणीय संरक्षणाच्या दृष्टीने आवश्यक पावले उचलण्याकडे लक्ष देण्याचे सुचवले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा