३२ धावांची कमकुवत आघाडी
आयसीसीच्या पहिल्या वाहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये न्यूझीलंड संघाचा डाव २४९ धावांवर आटोपला आहे. न्यूझीलंड संघाला ९९.२ षटकांत २४९ धावांमध्ये रोखण्यात भारतीय संघाला यश आले आहे. त्यामुळे आता भारतीय संघासमोर न्यूझीलंडने ३२ धावांची आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडकडून खेळताना कर्णधार केन विलियमसन याने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्याची झुंज एकाकी ठरली.
२२ जून रोजी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पाचव्या दिवशी भारतीय गोलंदाजांचा चांगलाच दबदबा पाहायला मिळाला. भारताकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने भेदक गोलंदाजीचा अप्रतिम नमुना दाखवत ४ बळी टिपले. तर इशांत शर्माने २ फलंदाजांना बाद केले. तर रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी एक एक बळी घेतले.
हे ही वाचा:
धक्कादायक! उंदरांनी कुरतडले बेशुद्ध रुग्णाचे डोळे
भारत आणि फिजीमध्ये नवा सामंजस्य करार
ज्या दिवशी हे सरकार पडेल, त्या दिवशी आम्ही पर्याय देऊ
२० दिवसांच्या विक्रमी वेळेत भारतीय रेल्वेने बांधला उड्डाणपूल
न्यूझीलंडकडून कर्णधार केन विलियमसन व्यतिरिक्त इतर कोणालाही प्रभाव पाडता आला नाही. विलियमसन याने १७७ चेंडूंमध्ये ४९ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. या खेळीने न्यूझीलंडच्या डावाला सावरण्याचा त्याने प्रयत्न केला. पण त्याला अपेक्षित साथ द्यायला इतर खेळाडू अपयशी ठरले.
न्यझीलंडने घेतलेली ३२ धावांची आघाडी पार करून त्यांना विजयी लक्ष्य देण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरला आहे. भारतीय संघाकडून सलामीची जोडी रोहित शर्मा आणि शुभमन गिल हे मैदानात उतरले असून भारतीय संघाने ५ षटकांत ७ धावा केल्या आहेत.