महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत ६ ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान आमनेसामने

आयसीसीने जाहीर केले वेळापत्रक

महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत ६ ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान आमनेसामने

बांगलादेशमधल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेचे सामने संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे खेळवले जाणार आहेत. बंगलादेशकडे या स्पर्धेचे यजमानपद असून ही स्पर्धा ३ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर रोजी होणार आहे. बहुप्रतिक्षित या स्पर्धेचे वेळापत्रक अखेर आयसीसीने जाहीर केले असून खेळातील सहभागी संघांचे गटही जाहीर करण्यात आले आहेत. या स्पर्धेच्या ९व्या हंगामात कोणता संघ स्पर्धेची ट्रॉफी उंचावणार याकडे लक्ष असणार आहे.

‘अ’ गटात ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका यांचा समावेश आहे. ‘ब’ गटात दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि स्कॉटलंड हे संघ आमनेसामने असणार आहेत. दरम्यान, भारताचा पहिला सामना न्यूझीलंड विरुद्ध ४ ऑक्टोबर रोजी असून भारत आणि पाकिस्तान हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ ६ ऑक्टोबर रोजी आमनेसामने येणार आहेत.

हे ही वाचा:

बलुच बंडखोरांनी केलेल्या विविध हल्ल्यांमध्ये पाकिस्तानच्या लष्करी जवानांसह ७३ जणांचा मृत्यू

राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याची देखरेख करणाऱ्या कंपनीच्या प्रोप्रायटर, स्ट्रक्चरल कन्सल्टंटवर गुन्हा

संविधानाला गाजराची पुंगी समजणारे कोण?

‘महिला सुरक्षेबद्दल बोलणारे उद्धव माझ्यासाठी काय करणार?’

श्रीलंका आणि स्कॉटलंड हे दोन संघ ‘आयसीसी’ महिला टी-२० वर्ल्डकप पात्रता फेरीतून मुख्य स्पर्धेत दाखल झाले आहेत. प्रत्येक संघ गटात चार सामने खेळतील आणि अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. स्पर्धेत एकूण २३ सामने खेळवले जाणार आहेत. तर, २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत १० सराव सामने होतील. १७ आणि १८ ऑक्टोबरला उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत. २० ऑक्टोबरला अंतिम सामना दुबईत होईल. तसेच उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आले आहेत.

भारतीय संघाचे सराव सामने

भारतीय संघाचे सामने

Exit mobile version