चॅम्पियन्स स्पर्धेचा करंडक पीओकेमध्ये आणण्याची योजना आखणाऱ्या पीसीबीला आयसीसीने फटकारले!

करंडक कोणत्याही वादग्रस्त ठिकाणी नेण्यास मनाई

चॅम्पियन्स स्पर्धेचा करंडक पीओकेमध्ये आणण्याची योजना आखणाऱ्या पीसीबीला आयसीसीने फटकारले!

भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी पाकिस्तानात जाणार की नाही यावर अजूनही स्पष्टता मिळालेली नसून अजूनही या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे आणि सर्व सामने पाकिस्तानात व्हावे, यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) ठाम आहे. तर, सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघ पाकिस्तानाला जाणार नसून ही स्पर्धा हायब्रीड पद्धतीने खेळवावी, अशी मागणी बीसीसीआयकडून केली जात आहे. मात्र, यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. अशातच आता आयसीसीने पाकिस्तान बोर्डाला दणका दिला आहे.

पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीचा दौरा आयोजित केला होता. पीओकेच्या तीन शहरांमध्ये ही ट्रॉफी घेऊन जाणार असल्याचे समोर आले होते. मात्र, याला आयसीसीने स्पष्टपणे नकार दिला असून चॅम्पियन्स ट्रॉफी कोणत्याही वादग्रस्त ठिकाणी जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. चॅम्पियन्स स्पर्धेचा करंडक १४ नोव्हेंबरला इस्लामाबादला पोहोचणार असल्याची घोषणा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून १४ नोव्हेंबरच्या संध्याकाळी करण्यात आली. यानंतर १६ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर या कालावधीत करंडक पाकिस्तानमध्ये नेला जाईल.

पीसीबीने सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली होती. यामध्ये पीसीबीने सांगितले होते की, करंडक स्कर्दू, मुरी, हुंजा आणि मुझफ्फराबाद या ठिकाणी जाईल. या चार ठिकाणांपैकी फक्त मारी हे ठिकाण पाकिस्तानचा भाग आहे. याशिवाय इतर तीन ठिकाणे स्कर्दू, हुंजा आणि मुझफ्फराबाद पाकव्याप्त काश्मीर (POK) मध्ये येतात. पाकिस्तानने या दौऱ्याची घोषणा करताच बीसीसीआयने यावर आक्षेप घेतला आणि आयसीसीने यावर कारवाई करत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला करंडक कोणत्याही वादग्रस्त ठिकाणी नेण्यास मनाई केली आहे.

हे ही वाचा : 

गृहमंत्री शहांच्या हेलिकॉप्टरची तपासणी, म्हणाले, भाजपा सर्व नियमांचे पालन करते!

मेट्रो- ३ च्या बीकेसी स्टेशनला आग; मेट्रोच्या फेऱ्यांना स्थगिती

श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताब बिष्णोईच्या हिटलिस्टवर!

शिवाजी महाराजांचे मंदिर नको, आधी गडकिल्ल्यांचे संवर्धन करा!

आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने लिहिले होते की, “पाकिस्तान सज्ज व्हा… आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे चषकाची टुअर १६ नोव्हेंबरपासून इस्लामाबाद येथून सुरू होत आहे आणि देशातील विविध शहरांमध्ये हा चषक तुम्हाला पाहता येणार आहे. स्कार्दू, मुरी, हुंझा आणि मुजफ्फराबाद या शहरांमध्येही हा चषक येणार आहे,” असे पीसीबीने द्विट केले होते.

Exit mobile version