27 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरविशेषइंदूर खेळपट्टीने घेतली बीसीसीआयची फिरकी

इंदूर खेळपट्टीने घेतली बीसीसीआयची फिरकी

आयसीसी मॅच रेफरींचे सरासरीपेक्षा कमी रेंटिग

Google News Follow

Related

इंदूरमधील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्यात भारताचा मानहानीकारक पराभव झाल्यानंतर आता आयसीसीने बीसीसीआयला झटका दिला आहे. इंदूरच्या होळकर मैदानाला आयसीसी मॅच रेफरींनी सरासरीपेक्षा कमी रेंटिग दिले आहे. त्यामुळे बीसीसीआयला आता १४ दिवसांच्या आत खेळपट्टीविषयी उत्तर द्यावे लागणार आहे. इंदूरच्या होळकर स्टेडियमवरील हा सामना अवघ्या अडीच दिवसात आटोपला.

याआधी झालेले पहिले दोन कसोटी सामन्याची परिस्थिती वेगळी नव्हती. तेही अवघ्या तीन दिवसाच्या आत संपले. मात्र आयसीसीने तिसऱ्या कसोटीतील इंदूरच्या खेळपट्टीवर आक्षेप घेतेले आहेत. खराब खेळपट्टी असे रेटिंग देत कडक ताशेरे खेळपट्टीवर ओढले आहेत. या सामन्यात भारताचा नऊ विकेट्सने दणदणीत पराभव झाला. दोन दिवसात ३१ विकेट्स या खेळपट्टीने घेतल्याने अनेक प्रश्न या खेळपट्टीविषयी उपस्थित झाले आहेत.

पहिल्या दिवशी भारतीय संघाची पहिल्याच सत्रात दाणादाण उडून अवघ्या १०९ धावांवर संपूर्ण संघ तंबूत परतला. ऑस्ट्रेलियाची सुरुवातही फारसी चांगली नव्हती, त्यांचेही दुसऱ्या दिवशी फलंदाज फार काळ खेळपट्टीवर तग धरू शकले नाहीत. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या चार विकेट्स गेल्या. भारताचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि उस्मान ख्वाजा यांनी अर्धशतक झळकावली हीच काय ती या कसोटीची जमेची बाजू.

हेही वाचा :

नितेश राणेंचा चिमटा आणि विधानसभा अध्यक्ष म्हणाले अनोळखी भटक्या कुत्र्यांवर कारवाई नाही!

हिजबुल मुजाहुद्दीनच्या कमांडरची बारामुल्लाहमध्ये मालमत्ता जप्त

मुंबईचा प्रभात कोळी बनला सात समुद्रांचा राजा

विधानसभा नवनियुक्त हक्कभंग समितीची आज बैठक

या खेळपट्टीवर दुसऱ्या दिवशी १६ फलंदाज बाद झाले. भारताचा दुसरा डाव केवळ १६३ धावांवर आटोपला आणि ऑस्ट्रेलियाला ७६ धावांचे विजयाचे लक्ष दिले. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान १ विकेट्स गमावून पूर्ण केले. यामुळे भारतातील कसोटी सामन्यांसाठी तयार केलेल्या खेळपट्ट्या पुन्हा एकदा चर्चच्या विषय ठरल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा ऑफस्पिनर नॅथन लियॉनने दुसऱ्या डावात ८ बळी टिपले आणि पहिल्या डावात ३ बळी घेतले. पहिल्याच दिवसापासून इंदूरच्या खेळपट्टीवर एक विचित्र वळण पाहायला मिळाल्याचे अनेक क्रिकेट तज्ज्ञांचे मत आहे.

आयसीसीचे सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी आपला अहवाल आयसीसीला सादर केला आहे. त्यांनी ही खेळपट्टी गोलंदाज आणि फलंदाज यांच्यात समतोल निर्माण करत नव्हती. पहिल्या चेंडूपासून खेळपट्टी फिरकीला साथ देत होती. संपूर्ण सामनाभर असेच सुरू होते. संपूर्ण सामन्यात चेंडू असमान उसळी घेत होता, असा अहवाल त्यांनी आयसीसीला दिलेला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा