पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला दणका; आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन हायब्रिड मॉडेलनेचं!

आयसीसीने केले स्पष्ट; इतर स्पर्धांचे आयोजनही हायब्रिड पद्धतीनेच होणार

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला दणका; आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन हायब्रिड मॉडेलनेचं!

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती म्हणजेच आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ बाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसंबंधीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन हे हायब्रिड मॉडेलनेच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या यजमानपदाचा मान यंदा पाकिस्तानकडे असून बीसीसीआयने भारतीय संघाला सुरक्षेच्या कारणामुळे पाकिस्तानमध्ये पाठवण्यास नकार दिला होता. यावर पाकिस्तान बोर्डने आक्षेपही घेतला होता. मात्र, आयसीसीने बीसीसीआयची मागणी मान्य करत भारताचे सामने त्रयस्थ ठिकाणी खेळवण्यात येणार असल्याचं जाहीर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा दणका दिला आहे. त्यामुळे ही स्पर्धा आता हायब्रिड मॉडेलनेच खेळवली जाणार असल्यचे स्पष्ट झाले आहे.

आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीसह इतर स्पर्धांचे आयोजनही हायब्रिड पद्धतीनेच होणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यानुसार महिला वर्ल्ड कप २०२५ स्पर्धाही हायब्रिड पद्धतीने खेळवण्यात येईल. या महिला वर्ल्ड कप २०२५ च्या यजमानपदाचा मान भारताकडे आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट टीम भारतात येणार नाही. तसेच २०२६ साली पुरुष टी- २० वर्ल्ड कप होणार आहे. या वर्ल्ड कपचं आयोजन संयुक्तरित्या भारत आणि श्रीलंकेत करण्यात आलं आहे. त्यामुळे पाकिस्तान आपले सामने श्रीलंकेत खेळणार आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे वेळापत्रक लवकरच निश्चित केले जाणार आहे. अंतिम आठ संघांच्या या स्पर्धेत यजमान पाकिस्तानसह अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे.

हे ही वाचा : 

नोकरीच्या नावाखाली पाकिस्तानात अडकलेल्या हमीदा बानो २२ वर्षानंतर भारतात परतल्या!

“मी आधुनिक अभिमन्यू, मला चक्रव्यूह भेदता येतो”

अमोल कीर्तीकरांना न्यायालयाचा दणका; रवींद्र वायकारांची खासदारकी कायम!

राहुल गांधींमुळे झाली दुखापत; जखमी भाजपा खासदाराचा आरोप

भारत आणि पाकिस्तान या दोन राष्ट्रांमधील तणावपूर्ण राजकीय संबंधांमुळे, भारताने २००८ पासून आशिया चषक स्पर्धेत भाग घेतल्यापासून पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये शेवटची द्विपक्षीय मालिका २०१२- १३ मध्ये भारतात खेळली गेली होती. ज्यामध्ये पांढऱ्या चेंडूच्या सामन्यांचा समावेश होता. त्यानंतर, भारत आणि पाकिस्तान प्रामुख्याने आयसीसी स्पर्धा आणि आशिया कपमध्ये एकमेकांसमोर आले आहेत.

Exit mobile version