28 C
Mumbai
Thursday, January 2, 2025
घरविशेषआयसीसी पुरस्कार:विराट कोहली बनला 'आयसीसी वनडे क्रिकेटर ऑफ द इयर'!

आयसीसी पुरस्कार:विराट कोहली बनला ‘आयसीसी वनडे क्रिकेटर ऑफ द इयर’!

विराट कोहलीच्या नावे हा चौथ्यांदा किताब

Google News Follow

Related

टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहलीने इतिहास रचला आहे. आयसीसीने कोहलीला एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठा सन्मान दिला आहे. २०२३ मधील उत्कृष्ट कामगिरीसाठी विराट कोहलीला ICC पुरुषांचा एकदिवसीय क्रिकेटपटू म्हणून निवडण्यात आले आहे.विराट कोहलीने चौथ्यांदा हा किताब पटकावला असून अशी कामगिरी करणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.

कोहलीने २०२३ च्या पहिल्या महिन्यात श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दोन जबरदस्त शतके झळकावली होती आणि त्यानंतर नोव्हेंबरमध्ये विश्वचषक २०२३ च्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध विश्वविक्रमी ५० वे शतक झळकावले होते.मागील वर्षी वनडे क्रिकेटमध्ये विराटने दिमाखदार कामगिरी केली. त्याने २७ सामन्यांमध्ये १३७७ धावा केल्या.कोहलीने या कालावधीत ६ शतके झळकावली, त्यापैकी ३ शतके फक्त २०२३ च्या विश्वचषकात झाली.

विश्वचषक स्पर्धेत कोहलीने ११ डावात ९५ च्या सरासरीने ७६५ धावा केल्या, जो एका स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा नवा विक्रम आहे. यावेळी कोहलीने उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकावून महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा ४९ वनडे शतकांचा विक्रम मोडला होता. या फॉरमॅटमध्ये ५० शतकं पूर्ण करणारा तो पहिला फलंदाज ठरला. याशिवाय त्याने अंतिम सामन्यातही अर्धशतक झळकावले पण संघाला विजेतेपद मिळाले नाही.

हे ही वाचा:

महाराष्ट्रातील मंत्र्यांचा अयोध्या दौरा लांबणीवर ?

मालदीवमधून लष्कर माघारी बोलावण्याचे कोणतेही आदेश नाहीत!

नरेंद्र मोदींवर नव मतदार खुश!

जागावाटपावर एकमत झाले नाही, तर ‘इंडिया’ आघाडीचे खरे नाही

या शर्यतीत कोहलीशिवाय टीम इंडियाचे आणखी दोन सहकारी होते. शुभमन गिलने गेल्या वर्षी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक १५८४ धावा केल्या होत्या, तर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने विश्वचषक स्पर्धेत विक्रमी २४ बळींसह ४३ बळी घेतले होते. याशिवाय न्यूझीलंडचा डॅरिल मिशेलही या शर्यतीत होता पण कोहलीने या सर्वांना मागे टाकत अव्वल ठरला.

विराटने विक्रमी चौथ्यांदा एकदिवसीय सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावला आहे.२०१२, २०१७ आणि २०१८ मध्येही विराट ‘आयसीसी वनडे क्रिकेटर ऑफ द ईयर’ बनला होता. विराट कोहलीचा हा १० वा आयसीसी पुरस्कार आहे.

सर्वांत जास्त आयसीसी अवार्ड जिंकणारे खेळाडू
विराट कोहली – १०
कुमार संगकारा – ४
एम एस धोनी – ४
स्टीव्ह स्मिथ – ४
मिचेल जॉनसन – ३

ऑस्ट्र्लियाचा कर्णधार पॅट कमिंसला ‘आयसीसी मेंस क्रिकेटर ऑफ द ईयर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पॅट कमिंसच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्र्लिया संघाने २०२३ चा विश्वचषक आपल्या नावावर केला. ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा हा विश्वचषक जिंकला आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा