टी- २० वर्ल्डकप मध्ये भारत पाकिस्तान लढत होणार या दिवशी

टी- २० वर्ल्डकप मध्ये भारत पाकिस्तान लढत होणार या दिवशी

आगामी विश्वचषक स्पर्धेचे वेध जगभरातील क्रिकेट चाहत्यांना लागलेले असताना नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) टी २० विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यंदाच्या वर्षी विश्वचषक स्पर्धा ऑक्टोबर- नोव्हेंबर २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये पार पडणार आहे. टी- २० विश्वचषक स्पर्धेची सुरुवात ही १६ ऑक्टोबरपासून होणार आहे. सुपर- १२ राऊंडची सुरुवात २२ ऑक्टोबरपासून होईल. सुपर- १२ मध्ये पहिला सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणार आहे. भारताचा पहिला सामना २३ ऑक्टोबरला होणार आहे.

विश्वचषक स्पर्धेत भारत, पाकिस्तान, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, इंग्लंड, अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया हे संघ आधीच पात्र ठरले आहेत. श्रीलंका, नाम्बिया, स्कॉटलंड आणि वेस्ट इंडिज हे चार संघ पात्र ठरण्यासाठी खेळणार आहेत. यामधून निवडलेल्या दोन संघांना सुपर १२ मध्ये खेळण्याची संधी मिळेल.

टी- २० विश्वचषकाचे सामने ऍडलेड, होबार्ट, ब्रिस्बेन, मेलबर्न, पर्थ, जिलॉन्ग आणि सिडनी या सात ठिकाणी होणार आहेत. उपांत्य सामने ९ आणि १० नोव्हेंबर रोजी तर विश्वचषकाचा अंतिम सामना १३ नोव्हेंबर रोजी मेलबर्नमध्ये खेळला जाणार आहे.

भारताचा पहिला सामना हा २३ ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध असणार आहे. मेलबर्नच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान सामना रंगणार आहे. याआधी २०२१ मध्ये टी- २० विश्वचषकात भारत- पाकिस्तान यांच्यात सामना रंगला होता. त्या सामन्यात पाकिस्तानने भारताला पराभूत केले होते.

हे ही वाचा:

लाखभर रुपये घेऊन विकत होते प्रमाणपत्र; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

नस्ती ‘किटकॅट’; चॉकलेटवर भगवान जगन्नाथाचा फोटो

धक्कादायक! माजी सरपंचाने गर्भवती वनरक्षकाला केली मारहाण

वैद्यकीय अभ्यासक्रमात २७ टक्के ओबीसी आरक्षणाला ‘सर्वोच्च’ पाठिंबा

विश्वचषकातील भारताचे सामने

ग्रुप- १: इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि अन्य दोन क्वालिफायर
ग्रुप- २: भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांग्लादेश आणि अन्य दोन क्वालिफायर

Exit mobile version